नाशिक मिरर : युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माणुसकीचा मदतीचा एक हात व छोटासा प्रयत्न छावा क्रांतिवीर सेना व समस्त भूम व पाथरूडकर बांधवाकडून दिलेली मदत पूरग्रस्त नागरिकांसाठी पोच करण्यात आली.

हालोंडी , शिरोली,रुई,चंदूर कोल्हापूर जिल्हा या पूरग्रस्त भागात जाऊन तेथील बांधवांना प्रत्येक गावात,तेल,तूरडाळ,पोहे,रवा,ज्वारी,गहू,तांदूळ,कोलगेट,साबण,पार्ले बिस्किटे, शेंगदाणे, साखर,चहा पावडर अशी १० दिवस पुरेल अशी किराणा धान्य किट प्रत्येक गावात १०० किट प्रमाणे सुपूर्द केली. या सर्व पदाधिकाऱ्यांचे छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे, प्रदेश प्रवक्ते जीवन इंगळे, मराठवाडा संपर्क प्रमुख अमर शेख , जिल्हा प्रमुख महेश गवळी, यांनी कौतुक केले व आभार मानले. अत्यंत चांगल्या पद्धतीने गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवली यापुढेही लवकरात लवकर आणखी मदत पूरग्रस्त भागात संघटनेच्यावतीने पोहोचवली जाईल असा विश्‍वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.यावेळी छावा क्रांतिवीर सेना युवक तालुका अध्यक्ष गणेश नलवडे.वि.आ. ता.अध्यक्ष अर्जुन जाधव.समाजसेवक विठ्ठल बाराते, अजय शेंडगे,महेश गुळमे, आदि उपस्थीत होते.

बातम्या

Don`t copy text!