जीवनावश्यक वस्तूसह मनसे नगरसेवकाचे एक महिन्याचे मानधन देऊन केली मदत

नाशिक मिरर :
सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी,चिपळूण व कोकण विभागात या जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. या ठिकाणी शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. या पुरामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पूर, मुसळधार पाऊस तसेच दरडी कोसळल्यामुळे येथे मोठे नुकसान झाले आहे. घरच नष्ट झाल्यामुळे येथील नागरिकांना अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या मुलभूत गरजांसाठी भटकावे लागत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन मनसेने या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवले आहे.त्यानुसार एक हात मदतीचा आपला ही असावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातपूर विभागाच्या वतीने मनसे गटनेते तथा नगरसेवक सलीम शेख यांनी ५०० ब्लँकेट , सातपूर महिला विभागीय अध्यक्षा आरती खिराडकर यांनी १०० ब्लँकेट, मनसे शहर उपाध्यक्ष बंटी लभडे यांनी १०० ब्लँकेट असे एकूण ७०० ब्लँकेट पूरग्रस्त भागासाठी मनसेच्या शहर कार्यालयात जमा केले आहे. सदर मदत एकत्रितपणे पूरग्रस्त भागात पोहचविण्यात आली आहे. तसेच नाशिक मनपा तील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व नगरसेविकाचे १ महिन्याचे मानधन ९० हजार रुपये देखील पूरग्रस्तसाठी देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील पुरस्थितीचा सर्वाधिक फटका चिपळूण शहराला बसला आहे. चिपळूण शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना पुढाकार घेत आहेत. पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागाला मदत करण्यासाठी मनसेनं देखील पुढाकार घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणाहून मदत पाठवायला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनसे देखील मदतकार्यासाठी सक्रिय झाली आहे. मनसेच्या वतीनं चिपळूणवासियांसाठी मदत पाठवण्याचं काम सुरु आहे.

वर्सोवा येथील मनसे शाखेकडून मदत :

वर्सोवा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी पुढे आली आहे. मनसेतर्फे कोकण, महाड, चिपळूण येथे रुग्णवाहिकांमधून कपडे, खाण्यापिण्याची सामग्री तसेच वैद्यकीय कीट पाठविण्यात आल्या आहेत.

 

मनसेतर्फे वैद्यकीय कीट :
वर्सोवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोकण, महाड, चिपळूण येथील लोकांना मदत पाठवण्यात आली आहे. त्यासाठी रुग्णवाहिकांमधून कपडे, खाण्यापिण्याची सामग्री मनसेतर्फे देण्यात आली आहे. तसेच पुरात जखमी झालेल्या नागरिकांसाठी मनसेतर्फे वैद्यकीय कीटसुद्धा पाठवण्यात आल्या आहेत.

 

बातम्या

Don`t copy text!