नाशिक मिरर : महिलेला कार विकत घेण्यासाठी उसने पैसे देण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून फिर्यादी महिला व अल्पवयीन मुलीस मारहाण करुन विनयभंग केल्या प्रकरणी बाल लैगिक अत्याचार संरक्षण कायद्या अंतर्गत सातपूरच्या महिलेसह चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूरच्या अशोकनगर येथील एका महिलेने सोनाली वाघमारे यांना कार विकत घेण्यासाठी ऑगस्ट २०२० व जानेवारी २०२१ ला दिड लाख रुपये उसनवार दिले होते.
या उसनवार दिलेल्या रकमेच्या वादातून दि.२९ मार्चला ८.३० वाजेला अचानकपणें सोनाली वाघमारे,सुमित आहिरे,अजय तुपलोंढे व विजय तुपलोंढे यांनी कुरापत काढून फिर्यादी महिलेच्या घरात घुसुन फिर्यादी महिलेस व तिच्या अल्पवयीन मुलीस मारहाण करुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिचा विनयभंग केल्या प्रकरणी बाल लैगिक अत्याचार संरक्षण कायद्या अंतर्गत महिलेसह चौघांच्या विरोधात सातपूर पोलिस ठाण्यात दि. ३ एप्रिलला सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सतिष पाटील करीत आहेत.
