सातपूर परिसरात नवरात्रोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
रेणुका माता मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन
नाशिक मिरर : वृत्तसेवा
सातपूर औद्योगिक वसाहती मधील सातपूर गाव, सातपूर कॉलनी, अशोकनगर, राधाकृष्णनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, आनंदवली आदी भागात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, दांडिया महोत्सव, मंदिराचे देखावे साकारण्यात आले आहेत.
श्री रेणुका माता मित्र मंडळ राधाकृष्णनगर
सातपूर :राधाकृष्णनगर येथे श्री रेणुकामाता मित्र मंडळाच्या वतीने श्री रेणुका माता मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन केले आहे.रोज सकाळी ६ वा आरती, दु.२ वा देवीचे पाठ, सायं ५ वा हरिपाठ सायं ७ वा.महाआरती रात्री साडेआठ ते साडेदहा हरी कीर्तन, सप्तमीला होम पूजा ,ह.भं.प भागवताचार्य माणिक महाराज बनकर यांचे २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दु.४ ते ५ या वेळात रामायण कथा चे आयोजन केले आहे. दि.२७ रोजी ह.भ.प रविदास वरसाडेकर , दि.२८ रोजी ह.भ.प अनिल जमधाडे, दि.२९ रोजी ह.भ.प तुकाराम घुगे, दि.३० रोजी शरद सरोदे, दि.१ रोजी ह.भ.प रामकृष्ण सानप, दि.२ रोजी ह.भ.प गंगाधर कवडे ,दि.३ रोजी ह.भ.प सुदामा कातकाडे , दि.४ रोजी ह.भ. प परमेश्वर उगले याचे सकाळी १० वाजता काल्याचे कीर्तन , आयोजित केले आहे.दि.३ रोजी परिसरातुन रेणुका मातेच्या पादुकाची पालखी मिरवणूक, दि.४ रोजी भव्य महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन इंद्रभान सांगळे सामाजिक कार्यकर्ते , कैलास चंदने, अध्यक्ष, भास्कर बोरसे, लहानु धात्रक, सुनील चव्हाण, डॉ.अनंत भदाणे, भालचंद्र शिंपी, भाऊसाहेब बनकर, रावसाहेब सातपुते आदीसह श्री रेणुका माता सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद, युवा समिती, वर्गणीदार यांनी केले आहे.

सातपूर : सप्तशृंगी वणी गडवरून रेणुका माता मित्र मंडळ यांनी पायी ज्योत आणली तिचे दर्शन घेते वेळे भाविक
