इच्छापूर्ती गणेश युवक मित्र मंडळ ,श्रमिक नगर

सातपूर : येथील श्रमिकनगर मधील इच्छापूर्ती गणेश युवक मित्र मंडळाच्या वतीने तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या भव्य मंदीराची आकर्षक अशी प्रतिकृती साकारली आहे. मंडळाच्या वतीने रोज दुर्गा सप्तश्रुती पाठ, सकाळ व रात्री महाआरती, केवळ महिलांसाठी दांडिया महोत्सव, विविध स्पर्धा, व बक्षीस वाटप आदी कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपमहानगर प्रमुख देवा जाधव व मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व युवा कार्यकर्ते यांनी केले आहे.दर्शनासाठी देखावा पाहण्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


सातपूर : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी माता मंदिराची साकारण्यात आलेली प्रतिकृती (छाया : सागर आनप)

बातम्या

Don`t copy text!