नाशिक मिरर :वृत्तसेवा महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठान व अशोक नगर फ्रेंड सर्कलचे यावर्षी मंडळाचे १६ वे वर्ष असून दरवर्षी देशातील विविध प्रसिद्ध मंदिराचा देखावा व सेट उभारण्यात येतो. यावर्षी मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य , संस्थापक विक्रम सुदाम नागरे व माजी नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी केदारनाथ मंदिराचा भव्य देखावा साकारण्याचे ठरवले आहे. सदर देखाव्या चे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच यावर्षी भव्य दांडिया रास आयोजन केले आहे. तसेच दि.२६ रोजी घटस्थापनेच्या दिवशी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सप्तशृंगी देवी मंदिर सातपूर कॉलनी येथून दुपारी चार वाजता मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या मिरवणुकीसाठी मुख्य तीन ढोल पथकांचा समावेश होतो. त्यामध्ये गुरुकृपा ब्रास बँड दावचवाडी नाशिक मधील सूर प्रसिद्ध सिंहगर्जना ढोल पथक तसेच नाशिक शहराची शान असलेला नाशिक ढोल ताशा पथक हे तीनही ढोल पथक सहभागी झाले होते. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी, महात्मा गांधी, असे वेशभूषा केलेले तरुण-तरुणी मुख्य घोड्यावर सवार झाले होते. महिला व नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. देखावा पाहण्यासाठी व दर्शनासाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन महाबली ग्रुप संस्थापक धर्मवीर विक्रम सुदाम नागरे,माजी नगरसेविका इंदुबाई सुदाम नागरे,अध्यक्ष रवींद्र पालवे, सिद्धार्थ शिंदे,कल्पेश पाटील, व अशोक नगर फ्रेंड सर्कल मधील सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. आहे. तसेच दहा दिवस मोठ्या उत्साहात देवीचे पाठ, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, आरती साठी सायंकाळी स्थानिक जेष्ठ नागरिक मंडळी, मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते दररोज ११ जोड्यांच्या हस्ते आरतीची विधिवत पूजा करून आरती करण्यात येणार आहे.
सातपूर : महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठान प्रणित अशोक नगर फ्रेंड सर्कल वतीने साकारण्यात येत असलेला केदारनाथ मंदिराचा देखावा
