नाशिकमध्ये आंदोलन; आंदोलक पाेलिसांच्या ताब्यात
नाशिक मिरर :
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याविरोधात नाशिकमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात ओबीसी समाजाच्या सर्व संघटनांनी द्वारका चौकात गुरूवारी (दि.१७)
रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या.
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.सर्वोच्च न्यायालयाने नुकतान एक निर्णंय दिला आहे. त्यानूसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद व महानगरपालिकांमधील
ओबीसी समाजाच्या सुमारे ५५ हजार जागांवर गंडातर आले आहे. त्यामुळे हे आरक्षण वाचविण्यासाठी केंद्र सरकारने ओबीसी समाजाची स्वतंत्र्यपणे जनगणना करावी. यासह विविध मुद्यांवर समता परिषदेच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये
ओबीसी समाज रस्त्यावर ऊतरला आहे. दरम्यान, ज्या व्यक्ती या आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत, अशा व्यक्तींना यापुढे निवडणूकांमध्ये मतदान न करण्याचा निर्णंय यावेळी घेण्यात आला. तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोवर लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही करण्यात आला. नाशिकप्रमाणे मनमाड व
जिल्ह्यातील विविध तालूक्यातही याप्रसंगी आंदोलन झाले.
आंदोलनात समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, नगरसेवक संतोष गायकवाड, अंबादास खैरे, समाधान जेजूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी द्वारका चौकात पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला.
