नाशिक मिरर : सातपूर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सातपूर कॉलनी मधील मनपाच्या सामाजिक कार्यलयात मध्ये सातपूर पोलीस स्टेशन कडून परवानगी नाकारली असताना देखील जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप व कर्तृत्ववान महिलांचा सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमा मध्ये कोविड १९ बाबत प्रसार होऊ नये शासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या मुळे आयोजकांवर दि.१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणा निर्णयानुसार पोलीस आयुक्त यांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात वेळोवेळी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. नियमांचे तंतोतंत पालन करणेबाबत आवाहन केले होते. त्याप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन २००५, ०४) भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ अन्वये गर्दी करू नये, बाबत मनाई आदेश असतांना योगेश उर्फ बंटी दत्तात्रय लभडे, रा. सातपुर कॉलनी, नाशिक यांनी व त्यांचे सहकाऱ्यांनी विनामास्क व सुरक्षित अंतर न ठेवता कोरोनाचा संसर्ग गर्दीमुळे होवु शकतो हे नियम माहीत असतांना दि. १४ रोजी सचिन सिन्हा, विजय अहिरे, मिलींद कांबळे, अंबादास अहिरे, आरती खिराडकर व इतर कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त कार्यक्रम बाबत परवानगी नाकारली होती.तरी देखील परिसरातील महीला तसेच नागरीकांना जमा केले. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसम एकत्र जमविणेबाबत पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मनाई आदेश व प्रशासनाचे आप्पत्ती व्यवस्थापन आदेशाचे उल्लंघन करून वाढदिवसाचे निमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा करून विनामास्क व सुरक्षित अंतर न ठेवता कारोनाचा संसर्ग गर्दीमुळे होवु शकतो हे माहीत असतांना गर्दी जमवुन वाढदिवस साजरा केला. म्हणुन शासनाने तर्फे फिर्याद वरून सातपुर पोलिस स्टेशन मध्ये भारतीय दंड विधान कलम २६९,२७०,१८८,३४ सह म.पो.का १३५ व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन २००५ चे कलम ५१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा पोलीस उप आयुक्त विजय खरात, सहा. पोलीस आयुक्त सोहेल शेख, यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी कारवाई केली सदर गुन्हाचा तपास पो.हवा पाटील हे करीत आहेत.
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पारित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जात आहे.यापुढील काळात सातपूर परिसरात विना परवानगी राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम नियमांचे उल्लंघन करून केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
-किशोर मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर
