भरती प्रक्रिया मध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी
नाशिक मिरर वेबटीम : राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट २०२० सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत असून संस्थेतील प्रवेश पूर्ण क्षमतेने होण्याकरिता नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.तसेच प्रवेश अर्ज करून देखील अपूर्ण प्रवेश अर्ज भरणे,प्रक्रियाच्या वेळी अनुउपस्थित राहल्या मुळे प्रवेश पासून वंचीत राहनाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश मिळवता येणार आहे. प्रवेश अर्जात दुरुस्ती करणे व इयत्ता दहावीच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारासाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रवेश अर्ज सादर करणे व प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा दिनांक १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२१ पर्यत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. शासकीय आयटीआय सातपूर नाशिक येथे फिटर मशिनिस्ट, प्लंबर, पेंटर, स्टेनोग्राफी, वायरमन ,वेल्डर, टूल ऍण्ड डाय मेकर ,इतर विवीध ट्रेड साठी एकूण रिक्त असलेल्या ३४५ जागा करिता भरती प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
ऑनलाइन प्रवेश अर्ज http://admisson.dvet
.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अर्ज कोणत्याही ऑनलाइन स्रोतांमधून(सायबर कॅफे) भरता येईल. जे उमेदवार नव्यांने प्रवेश अर्ज भरतील त्यांचा या प्रवेश फेरी प्रक्रियेसाठी विचार केला जाईल. तसेच आज पर्यंत अर्ज भरून सुद्धा ज्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांनी आपल्या प्रवेश अर्जात दुरुस्ती करून या फेरीसाठी संस्था निवडायची आहे.प्रवेश प्रक्रिये दरम्यान उमेदवारानां काही अडचण आल्यास त्यांनी आयटीआय सातपूर नाशिक संपर्क करावा.
शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना जास्त मागणी होत आहे. तरी या कोरोना काळात बदललेल्या परिस्थिती व वाढीव फेरीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य राजेश मानकर यांनी केले आहे.
