नाशिक मिरर वेबटीम : गेल्या पुर्ण वर्षभर कोरोनाने थैमान घातल्याने राज्यातील किल्ले वरील ऐतिहासिक पर्यटन देखील बंद होते. यामुळे शिवभक्त व दुर्गप्रेमी किल्ले ना भेट देण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. महाराष्ट्रात हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. आणि यामध्ये किल्ले ना भेट देण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच संधीचा फायदा घेत आणि नववर्ष अनोख्या पद्धतीने साजरा व्हावे या उद्देशाने नाशिक मधील स्वराज्य फाउंडेशन च्या वतीने किल्ले शिवनेरी वर साफसफाई मोहीम राबविण्यात आली. व शिवाई मंदिरात दुधाचा अभिषेक करून नववर्षाच स्वागत अगदी अनोख्या पद्धतीने करण्यात आले. या वेळी फाउंडेशन चे संस्थापक आतिश शार्दुल, अध्यक्ष हर्ष जाधव, उपाध्यक्ष हर्षद आहेर व सहकारी उपस्थित होते.
