४०० महिला व नागरीकांनी घेतला लाभ
नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मधील जाधव संकुल मध्ये नूतन वर्ष व वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते शाम फर्नांडिस यांच्या पुढाकाराने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या आरोग्य सेवा सप्ताहात परिसरातील नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला.या आरोग्य सेवा सप्ताहात चारशे नागरिकांच्या शरिराची आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले शाम फर्नांडिस यांनी आपल्या परिसरात एक आगळावेगळा उपक्रम राबवला.या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आला.आरोग्य शिबिराच्या उपक्रमात शरीराच्या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या.तसेच औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.हे शिबिर मोतीवाला मेडिकल काँलेज ,सह्याद्री स्पेशालिटी हाँस्पिटल,यांच्या सहकार्याने राबविण्यात आले.या शिबिरासाठी तज्ञ डाँक्टरांचे मार्गदर्शन लाभले.या सात दिवसांच्या शिबिरात शिबिरात ४०० नागरिकांनी सहभाग घेतला.असा अगळा वेगळा उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.बदलती जिवनशैली व आरोग्य कडे नागरिकांचे होत असलेले दुर्लक्ष या समस्या हानिकारक ठरत आहे.यासाठी नियमित आरोग्य विषयक तपसण्या करणे गरजेचे आहे.नागरिकांचे आरोग्य कसे सुदृढ राहिल या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शाम फर्नांडिस सांगितले.
