नाशिक मिरर वेबटीम :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर नाशिक मनपा शिक्षण विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकाना तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करावा.अशी मागणी शिक्षण सभापती संगीता गायकवाड यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांना लेखी निवेदन देवून केली. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या फाईलमधील त्रुटी याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यानंतर सातव्या वेतन आयोगाच्या फाईल मधील त्रुटी संदर्भात लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली .प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांची भेट घेऊन समकक्ष वेतन श्रेणी बाबत पत्र देवून यावर चर्चा करण्यात आली. सेवानिवृत्त शिक्षकाप्रमाणेच कार्यरत शिक्षकाना सातवा वेतन आयोग लागू करावा .लवकरच सातवा वेतन आयोग लागू होईल.असे आश्वासन यावेळी मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिले.यावेळी नाशिक महानगरपालिका शिक्षण समिती सभापती संगीता गायकवाड ,नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश खांडबहाले , महाराष्ट्र राज्य शिक्षक आघाडीचे अध्यक्ष महेंद्र जाधव, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष राजेश दाभाडे आदी यावेळी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!