नाशिक मिरर : वृत्तसेवा
सातपूर औद्योगिक वसाहती मधील प्रबुद्धनगर मध्ये राहणारा अनिकेत अर्जुन पाईकराव वय १३ रा. महात्मा गांधी चौक, प्रबुद्धनगर यांनी घराच्या छताला ओढणीच्या साहाय्याने दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत अनिकेत याचे आई-वडील हे अर्जुन पाईकराव हे औरंगाबादला गावी गेले होते. अनिकेत देखील मला पण तुमच्या सोबत गावाला येऊदया असा हट्ट करत होता..
परंतु आई-वडिलांनी अनिकेत व त्याचा मोठा भाऊ यांना घरी ठेवून गावी गेले. याचा राग आल्याने अनिकेत चा मोठा भाऊ सकाळी शाळेत गेला असता सकाळी ९ वाजेच्या सुमारास अनिकेत ने गळफास घेऊन आत्महत्या केली.अनिकेत हा इयत्ता सातवी मध्ये प्रबुद्ध नगर मधील मनपा शाळेत शिकत होता.

