एकूण १ कोटी ४८ लाख रुपये निधीतून साकारले उद्याने; नगरसेविका माधुरी बोलकर यांचा पुढाकार

नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मध्ये राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत तत्कालीन पर्यटन मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या विशेष निधी मधून सातपूर मध्ये प्रभाग क्रमांक १० मध्ये लाहोटी नगर व खोडे पार्क समोर त्र्यंबकरोड लगत पर्यटक व स्थानिक नागरिकासाठी उद्यानासाठी एकूण १ कोटी ४८ लाख रुपयेचा निधी मिळाला होतो. सदर उद्यानाचे काम पूर्णत्वास आले आहे. सदर निधी मधून मनपाच्या भूखंडावर लाहोटी नगर येथील उद्यानाचे काम पूर्ण होऊन नागरिक व पर्यटक यांच्या साठी खुले करण्यात आले आहे. लाहोटी नगर मधील उद्यानास वीरशिरोमणी महाराणा प्रताप उद्यान नामकरणचा ठराव देखील करण्यात आला आहे. सदर दोन्ही उद्यानासाठी नाशिक मनपाच्या प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका तथा माजी प्रभाग सभापती सातपूर माधुरी बोलकर व सातपूर भाजपा मंडलाचे उपाध्यक्ष गणेश बोलकर यांनी विशेष प्रयत्न करून सदर उद्यानाचे काम साकारले आहे.

लाहोटी नगर मधील उद्यानामध्ये गवताचा लॉन्स, जॉगीग ट्रॅक, झाडे,लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारच्या खेळण्या व इतर सुविधा आहेत. सदर उद्यान खुले करण्यात आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे . तर खोडे पार्क समोरील उद्यानामध्ये नाशिक कुंभमेळा ची ओळख करून देणारे शिल्प बनवण्याचे काम सुरु असून ,उद्यान सुशोभित केले जाणार आहे. उद्यान त्र्यंबकरोड लगत असल्याने सदर शिल्प पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे असणार आहे. सदर उद्यानास नाशिक मनपा मध्ये ठराव करून छत्रपती संभाजी महाराज उद्यान असे नाव देण्यात आले आहे. सदर उद्यानात गुलाबाच्या २५० प्रकारच्या जातीचे फुलांचे रोपे लावण्यात येणार असून नाशिकची गुलशनाबाद अशी जुनी ओळख नव्याने नाशिककर व पर्यटकांना होणार आहे. अशी माहिती नगरसेविका माधुरी बोलकर यांनी सांगितले. सदर उद्यानाचे काम पूर्णत्वास असून लवकरच नागरिक व पर्यटकांना उद्यानाचा आनंद घेता येणार आहे. सदर उद्यानाचे काम मंजुरी कामात प्रभागाच्या नगरसेविका पल्लवी पाटील यांची देखील मदत मिळाली आहे. असे गणेश बोलकर यांनी सांगितले.

बातम्या

Don`t copy text!