नाशिक मिरर : देवळा महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी चे दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२१ या पाच दिवसांचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. दिनांक २२ रोजी शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल ए.के सिंग व सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे व सेक्रेटरी गंगाधर शिरसाट, उपप्राचार्या मालती आहेर यांच्या उपस्थित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लेफ्टनंट बादल लाड यांनी केले. यावेळी त्यांनी शिबिराची माहिती सांगितली व शिबिरामध्ये चालणाऱ्या अनेक घडामोडी तसेच डिफेन्स, मेडिकल, मॅप रिडिंग, फायरिंग कवायत, सायबर र्सेक्युरिटी, सिव्हिल डिफेन्स , राष्ट्रीय एकात्मता,रस्ता सुरक्षा अभियान, मुलींचे आरोग्य, मूल्यशिक्षण,पर्यावरण यासारख्या अनेक विषयांची माहिती या शिबिरामध्ये देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मालेगाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी छात्र सैनिकांना रस्ता सुरक्षा अभियान या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी युवक हा देशाचा कणा आहे .युवकांनी आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडावे.वाहतुकीचे नियम पाळावे.व समाजामध्ये उंच पातळीवर आपले नेतृत्व गाजवावं असे सांगितले.
दि. २३ रोजी ७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी नाशिक येथील प्रशासकीय अधिकारी राकेश कौल यांनी एस.एस.बी या विषयावर व्याख्यान दिले. व जास्तीत जास्त विद्यार्थी हे सैन्यदलामध्ये अधिकारी म्हणून नियुक्त व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. व विद्यार्थ्यांना मुलाखत कशी द्यावी याविषयी मार्गदर्शन केले.दि.२४ रोजी पहिले सत्र डॉ. चंद्रात्रे जयमाला यांनी सायबर र्सेक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन केले. व नवीन तंत्रज्ञानाबरोबर जगताना त्यांचा उपयोग योग्य पद्धतीने करावा असे त्यांनी सांगितले.डॉ. दिपिका शिंदे यांनी राष्ट्रीय एकात्मता या विषयावर मार्गदर्शन केले व राष्ट्रीय एकात्मतेची गरज समजून सांगितली.दुसरा सत्र
डॉ.मनीषा शिरसाठ यांनी मुलींच्या आरोग्य विषयी माहिती दिली. मुलींचे अनेक प्रश्नांची उत्तर दिले.उपप्राचार्या. डॉ. मालती आहेर यांनी विद्यार्थ्यांना समाजात उंच शिखरावर जात असताना मुल्यशिक्षणाची गरज सांगितली. व कॅम्पला शुभेच्छा दिल्या.
व या दिवशी विद्यार्थ्यांना फायरिंग चे प्रशिक्षण देण्यात आले.
दि. २५.रोजी गार्ड ऑफ ऑनर, रायफल खोलने व जोडणे. टेबल ड्रिल वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.दि.२६ रोजी धूम्रपान व व्यसनमुक्ती यावर शपथ देण्यात आली. यावेळी शपथ सुनील आहेर यांनी दिली. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये कर्नल ए.के सिंग यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
व संपूर्ण या पाच दिवसाच्या शिबिराचा समारोप ७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देण्यात आले. यावेळी देवळा महाविद्यालयाला हेल्थ हायजिन अँड बेस्ट डिसिप्लिन या स्मृतिचिन्हाने सन्मानित करण्यात आले.हा कार्यक्रम ७ महाराष्ट्र बटालियन एन सी सी नाशिक कमांडिंग ऑफिसर कर्नल ए.के सिंग. व प्रशासकीय अधिकारी कर्नल राकेश कौल, महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर , उपप्राचार्या मालती आहेर व सुभेदार मेजर राम लोक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. व ७ महाराष्ट्र बटालियन येथील पी.आय.स्टाफ सुभेदार अत्रे, सुभेदार हरीश वानिया , सुभेदार सागर पवार, नायब सुभेदार सुनील मांडवकर, सीएचएम कुमार लिंगायत, हवलदार नवनाथ खाडे, हवलदार तारे भालचंद्र, यांनी विद्यार्थ्यांना ५ दिवस सैन्यदलातील प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाला १५० विद्यार्थी उपस्थित होते.

