सातपूरगावच गावपण हरवलं उरल्या फक्त गल्लीच्छ वस्त्या
नाशिक मिरर वेबटीम :
सातपूर या गावाचा फार प्राचीन आणि जुना इतिहास आहे. सातपूरला सुरवातीला ७ वाडे असल्याने त्याला सातपूर असे नाव पडले. परतू सातपूर विभागाचा विचार केल्यास यामध्ये ५ प्रभाग आणि २० नगरसेवक, स्वतंत्र महापलिका विभागीय कार्यालय, पोलीस ठाणे, सातपूर मधील एमआयडीसी या मार्फत मिळणारे करोडो रुपायंचे उत्पादन, कामगारांची वसाहत असलेला हा परिसर अनेक समस्यांनी पुरता वेडून गेला आहे.
सातपूर गाव म्हटल कि, राजवाडा, कोळीवाडा, महादेववाडी, जगतापवाडी, प्रबुद्धनगर, स्वारबाबानगर या परिसराचा समावेश होतो. या परिसर प्रभाग ११ मध्ये येतो. गेल्या ५० वर्षापासून हे गाव आहे तसेच आहे. गावाला विकास काय आहे, हे अजून माहितीच नाही. सातपूर मधील अशोकनगर, सातपूर कॉलनी, श्रमिकनगर या भागाचा विचार करता या भागाने कधीच प्रगती व विकासाच्या दिशने वाटचाल केली आहे. परतू सातपूर गाव अजून आहे तिथेच आहे. आमचे सातपूर गावपण स्मार्ट होणार का असे प्रश्न नागरिकाना पडला आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा देखील महापलिका पुरवत नसल्याचे दिसून येते.हागणदारीमुक्त नाशिक करण्यासाठी महापालिकेने विशेष योजना राबवली होती.परंतु महादेव नगर, स्वराबाबा नगर, काळे नगर ,कांबळे वाडी सारख्या परिसरात नागरिकांना घरात राहण्यास जागा पुरत नाही ते शौचालय कुठे बांधणार ? यामुळे नागरीक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात.परंतु महादेव नगर मधील महालक्ष्मी चौक मध्ये असणाऱ्या मनपा च्या शौचालय सारखी दुरवस्था येथे बऱ्याच शौचालयाची आहे.देखभालीसाठी नागरिकांकडे पैसे वसुली केले जातात.पंरतु स्वच्छता राखणे व दुरुस्ती करणे याकडे मनपा प्रशासन व ठेकेदार दुर्लक्ष करतात. सातपूर गावातील लोकवस्ती गरीब कुटुबातील असल्याने त्यांचा पूर्ण दिवस मोलमजुरी करण्यातचं जाता त्यातच १०० घरांमागे फक्त ५ घरामध्येचं स्वच्छतालय असल्याने, महापलिकेचे जे सार्वजनिक स्वच्छतालये आहेत त्याची पुरती दुरवस्था झाली आहे.
परिसरात ३ ते चार ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतालये आहेत त्यातील २ सार्वजनिक स्वच्छतालया मध्ये ५ दर आकारणी करण्यात येते गावातील सपूर्ण वीस हजाराहून जास्त असलेल्या लोकसंख्येला हि व्यवस्था तोगडी आहे. त्यामुळे पहाटे व अडगळ जागेत नागरिकांना प्रांतविधी करावा लागतो. महादेव नगर महालक्ष्मी चौक येथे मनपाचे शौचालय ची दुरवस्था झाल्याने मनपाने ते पत्रे लाउन बंद केले आहे, दुरुस्ती केले जात नाही तोपर्यंत हे बंदच ठेवण्यात येणार आहे.नवीन शौचालय लोकसंख्याच्या मानाने कमी पडते.परिसरातील नागरिकांना दरवेळला ५ रुपये देणे परवडणारे नाही.लोक उघड्यावर प्रांत विधी करत असल्याने परिसरात सतत दुर्गंदी असते, महापालिकानेच स्वच्छतालयावर हे स्वच्छतालय धोकादायक झाले असल्याने नागरिकांनी त्याचा वापर करू नये, म्हणून मनपा ने बंद केले आहे. शौचालय बंद करण्यापेक्षा दुरुस्ती करणे योग्य नाही असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी केला आहे.सातपूर गावातील दुषित साठपाणी थेट नासर्डी नदी मध्ये सोडण्यात येत असल्याचे दिसून येते, हे पाणी पुढे गोदावरी नदीमध्ये मिसळत असल्याने या नासर्डीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे गोदावरी नदीदेखील दुषित होत आहे.शौचालय दुरुस्ती करून सुरू होत नसल्याने महादेवनगर जनसेवक समिती वतीने सातपूर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे समिती चे अध्यक्ष विजय आहिरे यांनी सांगितले आहे.
महादेववाडी परिसरातील असलेले शौचालयाची खूप दुरवस्था झाली आहे. शौचालयाची तुटफुट, घाणीचे साम्राज्य, दुर्गंदी यामुळे परिसर घाणयेरडे झाला आहे. महापालिका कडून कोणत्याही प्रकारची दुरस्ती व देखभाल केली जात नाही नगरसेवकाकडे अनेकदा तक्रार करून देखील लक्ष दिले जात नाही. –शीतल काळे, रहिवासी

