नाशिक मिरर वेबटीम: शेअर मार्केटमध्ये महत्त्वाची घडामोड दिसून येतेय. सेन्सेक्सने आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक उसळी घेतली आहे. सेन्सेक्सने 50 हजारांहून अधिक अंकांची उसळी घेतली आहे.आहे. बीएसईचे सेन्सेक्स 319 अंकांनी तेजीत आहे. सेन्सेक्स 50,111.93 टप्प्यावर आला. तर निफ्टी 14,730.95 च्या अंकावर आहे.

काल आयटी, उर्जा आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली घोडदौड दिसत होती.त्यामुळे बुधवारी शेअर बाजारात नव्या उंचाक दिसून आला. बीएसईच्या 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 393.83 अंकांवर म्हणजेच 0.80 टक्क्यांनी वाढून 49792.12 अंकांवर येऊन बंद झाला होता. या प्रकारेच एनएसईच्या निफ्टी 123.55 अंकांवर म्हणजेच 0.85 टक्क्यांनी उसळी मारुन 14,644.70 अंकांनी उसळी मारली होती.

बातम्या

Don`t copy text!