नाशिक मिरर : सातपूर मधील सातपूर भाजपा मंडलचे उपाध्यक्ष रवींद्र उगले यांची ग्राहक संरक्षण समिती च्या सातपूर विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.सदर समिती तर्फे ग्राहकाच्या हक्काचे रक्षण व ग्राहकांची होणारी फसवून टाळण्यासाठी व फसवून झाल्यास ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे. सातपूर विभागातील ग्राहकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी रवींद्र उगले यांना देण्यात आली आहे. ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती राष्ट्रीय अध्यक्ष दादा केदारे, राष्ट्रीय महासचिव राजेश आंधळे यांनी ही नेमणूक केली आहे.
