नाशिक मिरर : येथे शिवसेना व छावा क्रांतिवीर सेनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे व शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, गटनेते विलास शिंदे, प्रभाग सभापती योगेश शेवरे, नगरसेवक संतोष गायकवाड, तुषार जगताप, गणेश कदम यांच्या उपस्थितीत कोविड योद्धाचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कोरोना काळात ज्या बांधवांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरत सेवा दिली अशा कोरोना योद्धाना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या निमित्ताने दिवाळी निमित्त आयोजीत रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले.
कोविड योध्दा सन्मान मोतीवाला महाविद्यालयचे डॉक्टर फराज मोतीवाला,आरोग्य विभागाच्या कुसुम महाले, जेष्ठ पत्रकार रवींद्र एरंडे, सेवा ॲम्बुलन्सचे पाशा शेख, रोहिणी जोशी,सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक बोडके यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी राजे म्हणाले जे सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी हे चांगले काम करतात त्यांना शाबासकीची थाप देणे ही छत्रपती घराण्याची परंपरा आहे, त्याच पद्धतीने नगरसेविका हेमलता कांडेकर या देखील प्रभागात चांगल्या प्रकारची लोकहिताची कामे करत आहे तसेच करण गायकर यांच्या पत्नी.सविता गायकर यादेखील तितक्याच सामाजिक कार्यात अग्रेसर व राज कारणात सक्रिय असून कार्यक्रमासाठी झालेली गर्दी हे त्याचेच फलित आहे. छावा युवा नेते करण गायकर यांच्या सारखा युवा कार्यकर्ता महाराष्ट्रात ज्या पद्धतीने अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करून सर्वसामान्य जनतेची मदत करतो हे देखील तितकेच प्रशंसनीय कार्य आहे असे बोलून अशा युवा व खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी मी छत्रपती घराण्याचा वंशज असून हेमलता कांडेकर व सविता गायकर यांच्या साठी सदैव संपूर्ण ताकदीने उभा असल्याचे राजे म्हणाले. या प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या साठी व अकार्यक्षम प्रशासनाच्या विरोधात ठामपणे लढतील अशी अपेक्षा राजें यानी व्यक्त केली.

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर यानी छत्रपतींच्या वंशजांनी प्रभागात येऊन सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान करणे हे आमचे अहम भाग्य असून नागरिकांना वेठीस धरून कार्यक्रम पार पडणे ही आमची संस्कृती तर मुळीच नाही. दरम्यान प्रभागातील काही हुकूमशाही लोकप्रतिनिधींना प्रभाग म्हणजे त्यांची स्व: मालकीची मक्तेदारी वाटत असेल तर अशा मक्तेदारांना येणाऱ्या निवडणुकीत राजे छत्रपतींच्या आशीर्वादाने नक्कीच धूळ चारणार आहे. हुकूमशाही राजवटीतुन त्रस्त झालेल्या जनतेला कायमचे मुक्त करण्याचा विडा मी उचलला असून याच प्रभागात स्वराज्याचा भगवा फडकवणार आहे असे प्रतिपादन करण गायकर यांनी केले.
या कार्यक्रमा प्रसंगी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,माजी नगरसेवक सदाशिव माळी, सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, विष्णु घुगे, निवृत्ती शिंदे,ऍड देवमन शिंदे,परशुराम शिंदे, कौतिक जाधव, सोमनाथ,भिसे, किरण बढे, गुमानराव कुंडे,श्रद्धा जोशी,हिरामण ढिकले,भागवत घुमरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर कांडेकर यांनी केले. आभार प्रमोद जाधव यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उमेश शिंदे यांनी केले.
यावेळी प्राध्यापक राहुल शिंदे निर्मित स्वरसिंदुरा देशभक्तीपर गीतांचा शानदार कार्यक्रम सादर करण्यात आला. दीपावली निमित्त आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ प्रभाग ९ मधील महादेव मंदिर, श्रमिकनगर येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी साहेबराव जाधव, बाळा जारे, नवनाथ शिंदे , सम्राट सिंग, महेश आहेर, एमडी शिंदे, अविनाश गायकर, कमलेश कांडेकर, प्रितेश पाटील, गिरीश आहेर,तुषार पाटील,नितीन पाटील, किरण बोरसे, वैभव दळवी, निलेश शेजुळ, सोनू काळे, चंद्रकांत पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले .

