नाशिक मिरर वेबटीम : नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र या नगरसेवकांच्या संघटनेचा नाशिक मध्ये विभागीय मेळाव्याचे आयोजन रविवार दि. १७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता सातपूर येथील पपया नर्सरी समोरील हॉटेल मसाला वन मध्ये करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी सर्व पक्षीय व सर्व धर्मीय नगरसेवक, सर्व पक्षाचे गटनेते, विरोधी पक्ष नेते, महापौर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील नगरपंचायत नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नगरसेवकांच्या न्याय हक्कासाठी काम करण्या करिता व शासन दरबारी शासनास योग्य ती दखल घेण्यास सुचवण्या करिता नगरसेवक परिषदे संघटनेची स्थापना केलेली आहे.सदर मेळाव्यामध्ये मुंबई मध्ये नगरसेवकनिवास, पेन्शन योजना, मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी कायमस्वरूपी चा पास, प्रभागात विकास कामासाठी पुरेसा निधी आदी ची मागणी बाबत चर्चा व ठराव करण्यात येणार आहे. या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा प्रभाग क्र ९ चे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्या करिता नाशिक जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत नगरपालिका व महानगरपालिका येथील नगरसेवक ,माजी नगरसेवक,नगरसेविका यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मेळाव्याचे आयोजक दिनकर पाटील व जिल्हा अध्यक्ष सुनील गायकवाड, सलीम शेख, पुरुषोत्तम लोहगावकर , पुष्पा आव्हाड,अपर्णा धात्रक यांच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी नागपूर महापालिका सभागृहनेते विजय झलके, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संभाजी मोरे आणि पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गुजर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे मार्गदर्शन करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे व प्रदेश सचिव डॉ.कैलास गोरे पाटील, कार्याध्यक्ष संजीव वाडे व इतर पदाधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी नाशिक जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यामधील नगरसेवक व नगरसेविका यांनी उपस्थित राहावे.

बातम्या

Don`t copy text!