नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
म्हसरूळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मयुर पवार यांची बदली गडचिरोली येथे झाली. निरोप देण्यासाठी कार्यक्रमात म्हसरूळकरांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यावेळी सर्व जण भावनाप्रधान झाले होते. शुक्रवारी (दि.24) सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी नाशिक शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील उपस्थित होते.
म्हसरूळ परिसरातील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व कोविड काळात लाॅकडाऊनमध्ये पोलीस मित्र, विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम केलेल्या कार्यकर्त्यांकडून पवार यांचा सत्कार केला व निरोप देण्यात आला.
फुलांच्या वर्षावात त्यांना जड अंतकरणाने निरोप देऊन, पुढील आयुष्याची भरभराट तसेच लवकरात लवकर म्हसरूळ पोलीस ठाण्यातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पुन्हा एकदा आमच्यासोबत यावे, ही इच्छा प्रकट करण्यात आली. अनेक चांगल्या आठवणी आम्हाला कायमस्वरुपी स्मरणात राहील व असे तरुण उत्साही अधिकारी पुन्हा पुन्हा आमच्यात यावे असे सांगण्यात आले.
याप्रसंगी चतुर व चौकीचे पोलीस कर्मचारी भोये, रोकडे, पवार आदी पोलीस कर्मचारी व सुनिल निरगुडे, भाऊसाहेब नेहरे, अमर निकम, शिवजी पांडे, मोहन पाटील, प्रवीण तगडे, तुकाराम बोरस्ते, रवींद्र आढाव, अशोक वराडे, विनोद हाटकर, वैभव मोराडे, उमेश धनगर, श्रावण हाटकर, राहुल धनगर, सागर पिंगळे, किशोर भामरे, अक्षय सूर्यवंशी आदी उपस्थिती होते.
सुनील परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. गणेश पेलमहाले यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन विशाल मोराडे यांनी केले होते.
—
