नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
मेरी येथील सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.26) होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड यांनी दिली. ही सभा ऑनलाईन व्ही.सी. (झूम ॲप) द्वारे होईल. सकाळी 10 वाजता सभेस सुरूवात होणार आहे.
या सभेस सभासदांनी वेळेवर आवर्जुन उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष काकड, यांच्यासह उपाध्यक्ष ॲड. राजाराम लोहकरे व सचिव आणि राज्य वीज कर्मचारी संघटनेचे नेते अरूण म्हस्के यांनी केले आहे.
श्री. सुभाष काकड
अध्यक्ष, सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्था, मेरी-म्हसरूळ
***

