पावसाळ्यापूर्वी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी
नाशिक मिरर : सातपूर विभागात एकूण पाच प्रभाग आहेत. पाचही प्रभाग सातपूर आणि अंबड एमआयडीसी मध्ये परिसरात लागत येतात . त्यामुळे येथे मोठी लोकवस्ती असल्याचे दिसून येते. सध्या नाशिक शहरात कोविड १९ थैमान चालू असून परिस्थिती काहीशी नियंत्रणात येत आहे.पंरतु आजारावर नियंत्रण मिळवता वेळी दुसरेकडे प्रभागातील मूलभूत समस्या कडे दृलक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
सातपूर मधील श्रमिकनगर, माळी कॉलनी मधील नैसर्गिक नाला, राधाकृष्णनगर,शिवाजीनगर, सातपूर व अंबड औद्योगिक वसाहती मधील मोकळे भूखंड, रस्त्याच्या कडेला, चौकात , मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरचे ढीग दिसून येत आहे.काही कचरा दर सडलेल्या अवस्थेत आहे. पावसामुळे जागोजागी पाण्याचे डबके दिसून येत आहे. नैसर्गिक नाले ची साफसफाई केलेली नसून मागील वर्षी सारखे माळी कॉलनी व श्रमिकनगर मधील नागरिकांच्या घरात पाणी शिरू शकते. डासांची संख्या लाक्षणिक वाढली असून दिवसा व रात्री देखील डासांनी नागरिकांना हैराण केले आहे.त्यामुळे डेंगू, मलेरिया या सारखे रुग्ण वाढीस लागले आहे.या मुळे नागरिक देखील संभ्रमात आहे की, ताप आला तर डेंगू , मलेरिया आहे की कोविड आहे. लॉकडाऊन मुळे अनेक कामगारांचे रोजगार गेले आहेत. परिस्थिती बिकट असून नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ड्रेनेज, भुयारी गटारे, नैसर्गिक नाले मधील कचराची साफसफाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सातपूर विभाग कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
कोविड १९ सोबत साथीच्या आजाराला सुद्धा तोंड द्यावे लागू शकते. त्यासाठी आरोग्य विभाग यांनी तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
