नाशिक मिरर वेबटीम : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सातपूर शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने दरवर्षी प्रमाणे करण्यात आले होते.छत्रपती संभाजी महाराज जन्म ते त्याच्या बलिदानापर्यंत चा धगधगता इतिहास दाखविणारे महानाट्य दि.१९ शिवजयंती निमित्त सातपूर शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने आयोजन करण्यात आले होते.संभाजी महाराज जन्म, त्याचे बालपण, शंभूराजे चा विवाह,पुरंदर चा तह,छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांचे विविध पराक्रम ,गुजरात,रामनगर ,सुरत,जव्हार,नाशिक संभाजी राजे यांनींस्वराज्य दाखल केले तो क्षण, युध्द नीती, राज्य कारभार ,शिवराज्याभिषेक,
शंभूराजे विरोधात मंत्रिमंडळ कट कारस्थान, झालेलें विष प्रयोग असे विविध प्रसंग महानाट्यातुन दाखवण्यात आले.सायं. सात वाजता श्री .तुळजाभवानी आणि शिवरायांची महाआरती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होऊन त्यानंतर शंभूराजे या महानाट्यस सुरुवात झाली हिंदवी स्वराज्य निर्मितीचे वैभवशाली महाराजांचे शिवपूर्व प्रा. नितीन बानगुडे पाटील लिखित आनंद जावडेकर यांनी दिग्दर्शित श्री संभाजी महाराजांच्या भूमिकेत मयूर घोलप यांनी भूमिका साकारली होती. अभिजात लोककलांनी नटलेला भव्य ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला.यावेळी महानाट्यतुन शिवाजी महाराजांनी शिकवले की जगावे कसे, तर शंभूराजे यांनी मरावे तर कसे असे काळजाचा ठोका चुकीविणारे असे महानाट्य होते.
यावेळी कोविड १९ बाबत सर्व ती काळजी घेऊन उपस्थित नागरिकांना मास्क व सँनिटाईझर देण्यात आले होते. यावेळी उपस्थिताचे स्वागत सातपूर शिवजन्मोत्सव जयंती अध्यक्ष जी.एस.साळवे, व कार्याध्यक्षा कांता शेवरे यांनी केले.
प्रा. शिव शाहीर प्रवीण जाधव यांचा संगीतमय शिवचरित्रावर आधारित गर्जते मराठी शायरी पोवाडा कार्यक्रम दि.१८फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता संपन्न झाला .श्री छत्रपती शिवरायांचा पाळणा सातपूर परिसरातील माता -भगिनींच्या उपस्थितीत रात्री अकरा वाजता संपन्न झाला. जाणता राजा मैदान येथे शिवजन्मोत्सव समिती वतीने शिवतीर्थ अर्थात शिवरायांचे देखणे मंदिर उभारले गेले होते. या शिवमंदिरात रामशेज किल्ल्यावरील पवित्र माती चा कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होतो.रक्तदान शिबाराचे आयोजन केले होते.यावेळी ८० रक्तदात्या नी रक्तदान केले. कार्यक्रमासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार सीमा हिरे, मा.आ.अपूर्व हिरे, मा. खा समीर भुजबळ,नगरसेविका वर्षा भालेराव,हेमलता कांडेकर, इंदुमती नागरे, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, सीमा निगळ, नगरसेवक विलास शिंदे, दिनकर पाटील, प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, सलीम शेख, योगेश शेवरे तसेच समितीचे जीवन रायते, नितीन निगळ, करण गायकर, अमोल वाजे, गणेश बोलकर, अनिल गडाख, निवृत्ती इंगोले, इंद्रभान सांगळे,सुरेश खांडबहाले, बाळासाहेब जाधव, अमोल ईघे,रामहरी संभेराव,निलेश भंदुरे आदींसह सर्व पदाधिकारी व सदस्य,नागरिक, शिवप्रेमी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

