सातपूर : युके मेटल इंडस्ट्रीज क्रिकेट टूर्नामेंट २०२३ मध्ये विजेता सुपर स्टार संघास ट्राफि देऊन सन्मानित करतेवेळी उपस्थित मान्यवर 

रॉयल किंग संघ उपविजेता
नाशिक मिरर : सागर आनप
अंबड औद्योगिक वसाहती मधील युके ग्रुप ऑफ कंपनी च्या वतीने युके मेटल इंडस्ट्रीज क्रिकेट टूर्नामेंट २०२३ चे आयोजन मॉडेल सिएनसी(प्रीसिजन) विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
महिरावणी जवळील दुडगांव मधील क्रिकेट मैदान वर सदर क्रिकेट मैंचस चे आयोजन शनिवार दि.७ जानेवारी रोजी करण्यात आले होते. सुपर स्टार,रॉक स्टार,रॉयल किंग एलेव्हन,द अव्हेजर सदर मॅच मध्ये एकूण चार संघ सहभागी झाले होते.

यामध्ये एकूण ६ सामने झाले.प्रत्येकी ६ ओव्हर्स मंच घेण्यात आली. अंतिम सामना सुपर स्टार विरुद्ध रॉयल किंग संघ असा झाला.यामध्ये सुपर स्टार संघाने ६ ओव्हर्स मध्ये शानदार फलंदाजी करून ६८ रणांचे आव्हान रॉयल किंग ला दिले होते. परंतु सुपर स्टार च्या गोलंदाजानी रॉयल किंग ला ५५ धावपर्यंत रोखून धरले व सुपर स्टार संघ १३ रणांनी विजयी झाला.

    प्रमुख पाहुणे दीपक पाटील युनिट हेड सिएनसी, सुनील मराठे प्रोडक्शन मॅनेजर, एकनाथ बेझेकर सरपंच, उत्तम साळवे मा. उपसरपंच, माधुरी साळवे, सदस्य, दुडगांव ग्रामपंचायत यांच्या हस्ते विजयी संघ सुपर स्टार, उपविजेता रॉयल किंग, बेस्ट बॉलर दीपक सोनवणे (रॉक स्टार)९ विकेट्स, बेस्ट बॅट्समन नितीन पाटील (रॉयल किंग) ७९ रण यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

सुपर स्टार चे ज्ञानेश्वर शिंदे,रॉक स्टार चे सागर पटेल,रॉयल किंग एलेव्हनचे चांगदेव गायके,द अव्हेजरचे संजय श्रीसागर संघाचे कर्णधार होते. टूर्नामेंटचे आयोजन युके इंडस्ट्रीजचे अश्विन गुल्हाने, सागर पटेल, अशोक साळवे, एचआर यांनी केले होते.पंच म्हणून सुनील मराठे,आदित्य मराठे, कमलेश उगले, अपुर्व मराठे यांनी काम बघितले.यावेळी अशोक साळवे ,पोलीस पाटील युवराज चव्हाण ,विकास साळवे , संतोष साळवे, विकास साळवे,किशोर साळवे,तेजस साळवे, रवि शिंदे,सुहास साळवे,सौरभ साळवे, सुभाष जगताप व डीपीएल क्रिकेट क्लब च्या खेळाडुंनी क्रिकेट यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.युके मेटल इंडस्ट्रीज सिएनसी विभागास जानोरी येथे दोन वर्षे पूर्ण झालेत त्यानिमित्त उत्कृष्ट कामगार शरद आहेर व कंपनी व्यवस्थापन यांच्या हस्ते केक कापून आंनदोउत्सव साजरा करण्यात आला.

सुपर स्टार विजेता संघाचे खेळाडू : ज्ञानेश्वर शिंदे(कर्णधार),अश्विन गुल्हाने विजय आहिरे, किरण कदम, सागर आनप, भारत कोटमे,संदीप कोटमे, रोहन बागुल, शरद आहेर, सावता माळी, अमोल जगदाळे.

 

बातम्या

Don`t copy text!