नाशिक मिरर : सागर आनप

नाशिक तालुक्यातील दुडगांव ग्रामपंचायतवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )गटाने वर्चस्व मिळवले असून, आज उपसरपंचपदी शीतल साहेबराव जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. सरपंचपदी एकनाथ बेझेकर हे विजयी झाले आहेत. मा.ना.रामदास (नाना) चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (ठाकरे )गटाने दुडगाव मध्ये सत्तापरिवर्तन केले आहे.

        ग्रामपंचायत सदस्य माधुरी उत्तम साळवे,नंदु बोटे गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. छाया भगवान चव्हाण, लक्ष्मण रामदास बेझेकर, रुपाली दिनकर बेझेकर,दीपक लहानु साळवे हे ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहे.आज नाशिक तालुक्यातीला १४ ग्रामपंचायतींच्या पहिली ग्रामसभा संपन्न झाली व सरपंचांच्या अध्यतेखाली उपसरपंचाची निवड करण्यात आली.
        पॅनलची प्रमुख कार्यकारिणी अशोक बाजीराव साळवे पोलीस पाटील,संतोष झुंगा साळवे, भाऊसाहेब चव्हाण,शरद साळवे,प्रकाश जाधव, ,उत्तम साळवे,साहेबराव जाधव ,संपत डगळे, रविंद्र साळवे ,काशिनाथ जाधव,विकास साळवे, संतोष बेझेकर ,अनिल आहेर,विकास साळवे,मंगेश डगळे ,राजाराम साळवे ,मोतीराम चव्हाण ,झुंगाजी साळवे, सुहास साळवे ,महेंद्र साळवे, दिपक साळवे ,बाळु साळवे, मिलिंद शिंदे ,सुभाष जगताप, विलास झोले ,नवनाथ बेझेकर, शंकर बेंडकोळी, किशोर साळवे ,संजय चव्हाण,युवराज चव्हाण परीश्रम घेऊन विजय संपादित करण्यास मोलाचे सहकार्य केले.

बातम्या

Don`t copy text!