नाशिक मिरर : सागर आनप 
शिवजन्मोत्सव सोहळा यंदाही जोरदार होणार असल्याचे सर्व पक्षिय बैठकित निर्णय घेण्यात आला. भाजपाचे जेष्ठ नेते माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने लाखो रुपयांची देणगी शिवभक्तांनी यावेळी जाहिर केली.

दरम्यान बैठक सुरू होण्यापुर्वी शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर गेल्या वर्षीचा लेखो-जोखा खजिनदार जिवन रायते यांनी मांडला. यावेळी छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक करण गायकर यांनी दरवर्षी पेक्षा अधिक जोमाने शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा मनोद्यय व्यक्त केला.तसेच जी देणगी आपल्याकडून देणे दिलेल्या वेळेत शक्य होणार अशी देणगी बैठकीत घोषित करावे अशी सूचना केली.

यानंतर महेंद्र शिंदे, संजय राऊत, बाळासाहेब जाधव, डाँ. वृषाली सोनवणे,डॉ अमोल वाजे आदींसह मान्यवरांनी त्यांचे मत व्यक्त केली. भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डाँ, बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले या तीनही महापुरूषांचा जयंती उत्सव एकत्रीत साजरा करण्याबाबत सुचना केली. तसेच शिवजन्मोत्सवाला शिवप्रेमींनी सढळ हाताने मदत करा असे आवाहनही केले.

यावेळी गणेश बोलकर, समाधान देवरे, निलेश जाधव, लोकेश गवळी, धिरज शेळके, गोकुळ निगळ, अमोल पाटील, नितिन निगळ, रवीद्र देवरे, निवृत्ती इंगोले, इंदूबाई नागरे, जुनेद सलीम शेख, संजय राऊत,नरेश सोनवणे, बाळासाहेब जाधव,विजय धुमाळ, राजाभाऊ खताळे, दादा कांडेकर, अमोल पाटील, यांसह सर्व पक्षिय पदाधिकारी, शिवप्रेमी, शिवजन्मोत्सव समिती सदस्य उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!