नाशिक मिरर :

छावा क्रांतिवीर सेनेने रायगड जिल्ह्यामध्ये दमदारपणे एन्ट्री करत संघटन सुरू केले आहे. रविवार १ ऑगस्ट रोजी छावा क्रांतिवीर सेनाचा पदाधिकारी पदग्रहण सोहळा रायगड जिल्ह्यातील क्रांतीकारकाची भुमी शिरढोण येथे संपन्न झाला.यामध्ये जिल्हाध्यक्ष सह तालुका अध्यक्ष यांची निवड करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
येथील थोर क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारक स्थळी भेट देत अभिवादन करण्यात आले. तसेच समाधीस्थळा जवळ वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांसह केंद्रीय कार्याध्यक्ष नवनीत महाराज गोरले,मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम, आरोग्यदूत तुषार जगताप माझी नायब तहसीलदार दिलीप दळवी, सरपंच साधना ताई कातकरी, सामाजिक कार्यकर्त्या साधनाताई वाजेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी रायगड जिल्ह्यातील अनेक तालुका पदाधिकारी निवडी करण्यात आले.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वप्रथम महापूर व दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या बांधवाना श्रद्धांजली वाहत, उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनेची ध्येयधोरणे समजून सांगितली. संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, कामगार,विद्यार्थी,महिला यांसह वंचित नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे प्रथम असून ते सोडविण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. जिथे अन्याय अत्याचार होत असेल तिथे आपण आवाज उठवला पाहिजे व शोषितांना न्याय मिळवून दिला पाहिजे, छत्रपतींनी या रायगड जिल्ह्यात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आपली संघटना छत्रपती संभाजी राजांच्या नावाने कार्यरत आहे. त्यामुळे जबाबदारीने काम करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे,जेव्हा संघटनेचे पद दिले जाते. तेव्हा पदाचा दुरुपयोग न करता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी त्या पदाचा वापर होणे गरजेचे आहे,कोणीही वैयक्तिक स्वार्थ साधण्यापेक्षा संघटनेचे नाव मोठे कसे होईल अशी कामगिरी पदाधिकाऱ्यांनी करायला हवी, संघटना मोठी झाले तर त्या संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ता हा मोठा होत असतो. आपण महत्त्वाचे नसून आपण ज्या संघटनेत काम करतो ती संघटना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ही भावना आपल्या मनावर बिंबवले पाहिजे. आणि त्याच अनुसरून पुढील काळात काम उभे केले पाहिजे.


यासाठी जिल्हाध्यक्ष रोशन पवार या युवा नेतृत्वाच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे व त्यांचे हात बळकट केले पाहिजे असा संदेशही यावेळी त्यांनी उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिला. प्रत्येकाने डोळ्यासमोर स्वराज्यातील थोर क्रांतिकारक यांना ठेवून काम समाज उपयोगी कार्य करायला पाहिजे. तसेच सद्यस्थितीत जिल्ह्यात जी काही आपत्तीजन्य परिस्थिती आहे त्यात संघटनेच्या माध्यमातून मदतकार्य सुरू असून त्यात हातभार लावून नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यात कुठेही कमी न पडण्याचे आवाहन केले. यावेळी आरोग्यदूत तुषार जगताप यांनी बोलतांना म्हणाले की छावा क्रांतिवीर सेना ही एक आक्रमक संघटना आहे,या संघटनेचे वटवृक्ष सबंध महाराष्ट्रात पसरले असून या संघटनेच्या माध्यमातून आरोग्यसेवा ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे,गोरगरीब जनतेला जिथे आरोग्यविषयक समस्या असेल त्या ठिकाणी मदत घेऊन आपण पोहचले पाहिजे.

तसेच मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक अंकुश कदम हे बोलतांना म्हणाले की छावा क्रंतिविर सेना ही कार्यकर्ते नाही तर मावळे घडवत असते, कार्यकर्ते हे सकाळी एका पक्षाकडे तर जेवणाला दुसऱ्या पक्षाकडे तर संध्याकाळी तिसऱ्या पक्षाकडे जातात त्यामुळे कार्यकर्ते बनण्यापेक्षा छावाचे मावळे बनून कधीही स्वाभिमानी राहणे पसंत करा, करण गायकर यांसारखे अष्टपैलू नेतृत्व तुम्हाला लाभले आहे त्यांच्यातील प्रत्येक गुणांचा स्वीकार करत प्रामाणिकपणे समाजातील प्रश्‍न धडाडीने सोडवा, छावा क्रांतिवीर सेनेची जिल्ह्यात मदार सुरुवात आज करत आहात त्यामुळे या वटवृक्षाची पायामुळे इथे रोवण्यासाठी नेहमी तत्पर राहून काम करा अशी खात्री मला आजच्या या आपल्या उपस्थिती वरून जाणवत असल्याचे मत व्यक्त केले.

निवड करण्यात आलेले पदाधिकारी :-
रोशन महादेव पवार-रायगड जिल्हाध्यक्ष,
स्वप्निल कमलाकर घरत-जिल्हा संपर्क प्रमुख,
अशोक घरत-पनवेल तालुकाध्यक्ष,
जितेंद्र ठाकूर-पेन तालुकाध्यक्ष,
सुरेश जाधव-खालापूर तालुकाध्यक्ष,
अभिजित मोकळ-उरण तालुकाध्यक्ष,
महेश घरत-अलिबाग तालुकाध्यक्ष,
आदित्य वाघ-पनवेल तालुका उपाध्यक्ष,
नरेश म्हात्रे-पनवेल तालुका उपाध्यक्ष,
दीपक संसारे-पेन शहर प्रमुख,
दिलीप दळवी-पेन तालुका सल्लागार,
कृष्णा वाघमारे-खालापूर तालुका संपर्कप्रमुख,
प्रशांत ठाकूर-रामवाडी,पेन वार्ड अध्यक्ष,
समाधान म्हात्रे-गोळीबार मैदान,पेन वार्ड अध्यक्ष.

बातम्या

Don`t copy text!