नाशिक मिरर :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको, या अध्यादेशावर अखेर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे जो पर्यंत रद्द झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत लागू होत नाही, तो पर्यंत निवडणूका पुढे ढकलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे प्रभागरचना प्रसिध्द झाल्याने निवडणूका आता होणारचं आनंद व्यक्त करणार्या सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांना जोरदार धक्का बसला आहे.
सकाळीच अोबीसी नेते व मंत्री भुजबळ यांनी राज्यपाल कोश्यारी यांचावर तोफ डागली होती. अोबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी भूमिका सर्व पक्षांनी घेत अध्यादेश काढला होता. तो स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवला होता. मात्र राज्यपाल स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करत होते. त्यात नाशिकसह काही महापालिकांची प्रभाग रचना आज जाहिर झाली. ते बघता आता अोबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणार हे निश्चित झाले. त्यामुळे डोक्याला बाशिंग बांधलेल्या उमेदवारांनी पेढेच वाटले. तर अोबीसी उमेदवारांमध्ये नाराजी होती. अखेर वातावरण तापल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी अोबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाही या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. त्यामुळे जो पर्यंत न्यायालयाकडून अोबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत राज्यात निवडणूका होत नाही हे निश्चित झाले आहे. दुसरिकडे असे झाल्यास नाशिकसह अन्य महापालिकांवर प्रशासन राजवट लागू होऊ शकते.
