पहिला मजला जळून खाक ; लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक मिरर :

सातपूर औद्योगिक वसाहती मधील कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी निलराज इंडस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.याबाबत सविस्तर माहिती अशी की , दि.२ फेब्रुवारी बुधवार रोजी पहाटे ५ ते ५: ३० वाजेच्या दरम्यान सदर कंपनी ला आग लागली. ५ वाजून १० मिनिटांनी मनपा अग्निशमन दलास संपर्क केला असता , अग्निशमन दलाच्या ३ बंब, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा १ बंब, एमआयडीसी चा १ बंब च्या साहाय्याने ८ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. सकाळी १० वाजेपर्यंत सदर ठिकाणी कुलिंग चे काम सुरू होते.

आगी मध्ये पहिला मजला संपूर्ण जळून खाक झाला असून, लाखो रुपयांचे कॅपॅसिटर बनवण्यास लागणारे कच्चा माल जळाला आहे. आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजले नाही. यावेळी नाशिक मनपा अग्निशमन केंद्र प्रमुख राजेंद्र बैरागी, व पी.जी परदेशी, आर.ए लाड यांच्या एकूण २५ कर्मचारी आग विजवण्याचे कार्य करत होते.

 

Don`t copy text!