नाशिक मिरर :
सातपूर विभागाचे सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२२ नवनियुक्त अध्यक्ष संजय राऊत व कार्याध्यक्षा सौ.गीता संजय जाधव यांचा छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन छावा क्रांतिवीर सेना व शिवसेना प्रभाग ९ च्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा हा सातपूर विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या दिमाखात साजरा होत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर व दिमाखदार पणे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता,यावर्षीचा सोहळा सुद्धा कोरोनाचे सर्व नियम पाळून शिवभक्त मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी होतील. सातपूर शिवजन्मोत्सव समिती ज्या पद्धतीने या सोहळ्याचे नियोजन करते ते अतिशय कौतुकास्पद आहे.
व याचेच अनुकरण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा होत, शिवभक्त करत असतात, यावर्षी देखील निवड झालेले नवनियुक्त अध्यक्ष,कार्याध्यक्ष तसेच समिती पदाधिकारी हे अतिशय चांगले नियोजन करत आहे.जे लोक शिवजन्मोत्सव सोहळ्यात सभासद झालेले आहेत. त्या सर्व सभासदांचे घरी जाऊन छत्रपती शिवराय व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या विचाराचे पुस्तक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करत आहे,त्यामुळे या सोहळ्यामध्ये सक्रिय झालेल्या सदस्यांना सुद्धा आपण दिलेल्या योगदानाच समितीच्या वतीने यथोचित सत्कार केला जात असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
शिवजन्मोत्सव सोहळा हा बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या सर्व शिवभक्तांना घेऊन साजरा करण्याचा मानस नेहमी समितीच्यावतीने ठेवला जातो. त्यामुळे थोर महापुरुषांना एका चौकटीत अडकविणार्यांना एक मोठी चपराक आहे असेही त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी या स्वागत समारंभासाठी नगरसेविका हेमलता कांडेकर, सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव,विष्णुपंत घुगे,निवृत्ती शिंदे,शिवसेनेच्या सविता गायकर,प्रियंका गायकर यांसह शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य राजेश खताळे, बाळासाहेब जाधव,देवा जाधव,पुंडलिक बोडके तसेच शिवभक्त संजय तुपलोंढे,अविनाश गायकर,विनोद जाधव,विकी कांबळे ,प्रितेश पाटील,निलेश शेजुळ,गणेश दळवी,किरण बोरसे,गणेश वाघचौरे,अंकुश शिरसाठ उपस्थित होते.

