नाशिक मिरर वेबटीम : छावा क्रांतिवीर सेनेमध्ये नाशिक मधील शेकडो युवकानी छावाचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशानुसार युवा प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग,नाशिक जिल्हाध्यक्ष विजय खर्जूल,आयटी प्रदेश अध्यक्ष किरण बोरसे,युवा शहर अध्यक्ष वैभव दळवी यांच्या उपस्थितीमध्ये संघटनेच्या नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालया मध्ये नवीन नाशिक मधील शेकडो तरुणांनी छावा क्रांतीवीर सेनेत आज जाहीर प्रवेश घेतला. यावेळी संघटनेचे सर्व नियमावली तरुणांनी समजून घेतली तसेच संघटनेला बाधा येईल असे कुठलेही कृत्य करणार नाही, असे आश्वासन प्रवेश करणार्‍या तरुणांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिले.तसेच यानंतर दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून अनेक नवीन लोकांना संघटनेत सहभागी करू व गाव तिथे शाखा अभियान मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये राबवण्याचे आश्वासन देखील यावेळी प्रवेश करते वेळी योगेश पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले.यावेळी छावा क्रांतीवीर सेनेने पुढील नियुक्त्या करण्यात आल्या. योगेश पाटिल कामगार आ.जिल्हा अध्यक्ष नाशिक,कल्पेश पाटिल शहराध्यक्ष कामगार आ. नाशिक ,किरण पवार नाशिक शहराध्यक्ष डॉक्टर आघाडी,अर्जुन पाटिल नविन नाशिक शहराध्यक्ष विद्यार्थी आघाडी पदी नियुक्ती करून सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

बातम्या

Don`t copy text!