नाशिक मिरर : सातपूर  वृत्तसेवा

येथील नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक १० मधील अशोक नगर मधील सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे व त्यांच्या सोबत च्या अन्य मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री वर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला. इंद्रभान सांगळे यांचे प्रभाग क्रमांक १० मधील अशोकनगर, राधाकृष्णनगर,पिंपळगाव बाहुला ,श्रमिकनगर, गंगासागर नगर, विष्णूनगर, वास्तूनगर भागात मोठा जनसंपर्क आहे.

नाशिक मनपा निवडणुकीत मनसेकडून दोन पंचवार्षिक निवडणूकीत दुसऱ्या क्रमांकाचे मते त्यांनी मिळवली होती.त्या मुळे सातपूर मध्ये मनसेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेला प्रभाग १० मध्ये बळकटी मिळाली आहे. इंद्रभान सांगळे यांच्या पत्नी कलावती सांगळे यांचा  मागील महानगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अवघ्या अकरा मतांनी पराभव झाला होता. सातपूर शिवसेना विभागाला सांगळे यांच्या मुळे नवीन उभारी मिळेल असं बोलले जात आहे.

सांगळे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही मुंबई येथे उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला.यावेळी खा.संजय राऊत,उपनेते सुनील बागुल, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, मा.आ.वसंत गीते, योगेश घोलप,विलास शिंदे,दत्ता गायकवाड , देवा जाधव आदीसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

बातम्या

Don`t copy text!