नाशिक मिरर वेबटीम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ मार्च रोजी होणारी स्पर्धा परिक्षा रद्द केल्यानंतर काही राजकीय लोकांच्या दबावाला बळी पडून २१ मार्च रोजी सदर परिक्षा घेण्याचे जे निश्चित केले आहे त्यामध्ये, मुख्यमंत्री म्हणून आपण मराठा समाजाच्या मुला-मुलींचा विचार करून ही परीक्षा मराठा आरक्षणाचा निकाल येईपर्यंत पुढे ढकलावी. तसेच या दरम्यान काही विद्यार्थ्यांच्या वयाचा प्रश्न आहे. त्यांच्या साठी किमान दोन वर्ष वयोमर्यादा वाढवावी .त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या तरी ज्या विद्यार्थ्यांचे वय वाढणार आहे. त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.मराठा समाजाची व छावा क्रांतिवीर सेनेची MPSC च्या परिक्षा किंवा शासकीय नोकर भरती होवू नये, अशी भूमिका मुळीच नाही, सर्व समाजाच्या मुलांना न्याय मिळावा अशीच भूमिका सर्वांची आहे. परंतू सर्वांना न्याय देत असतांना मराठा समाजाच्या मुला-मुलींना मात्र या स्पर्धा परिक्षा व शासकीय नोकर भरतीपासून वंचित ठेवण्याचे काम करु नये. आणि त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. ही भूमिका आमची आहे. त्यामुळेच सदरील परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात ही आमची भूमिका होती व त्यापुढेही आहे. मात्र दबावाला बळी पडत आपण परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे याचा फेरविचार करावा.दिनांक १५ मार्च पासून मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी न्यायालयात सुरू होत असून, २५ मार्च पर्यंत ती पुर्ण होणार आहे. त्यांनतर ७ ते ८ दिवसांमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. म्हणजे दिनांक १ एप्रील पर्यंत आरक्षणा संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे. असे असतांना राज्य सरकारने शासकीय नोकर भरती आणि स्पर्धा परिक्षा ५ एप्रिल नंतर घेण्यात याव्या.राज्यातील काही मंत्री, प्रशासकीय अधिकारी व नेते यांनी मराठा समाजाविरोधात षड्यंत्र रचून मराठा समाजाच्या मुला-मुलींना MPSC स्पर्धा परिक्षेत स्थान मिळू नये , अशी कार्यवाही सूरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून काल स्पर्धा परिक्षेच्या विरोधामध्ये काही विद्यार्थ्यांना व नेत्यांना हाताशी धरुन आंदोलन उभे केले आहे. आणि त्याचे दडपण आपल्यावर आणले गेले. स्व.प्रबोधनकार ठाकरे यांचा व देशाचे कनखर नेतृत्च स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवणारे आजचे मुख्यमंत्री या नात्याने आपण ठाम रहावे. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज निर्णयाकडे बघत आहे. निवेदनाद्वारे विनंती आहे की, MPSC ची स्पर्धा परिक्षा ही ५ एप्रिल नंतरच घेण्यात यावी अशी मागणी छावा क्रांतिवीर सेना चे संस्थापक अध्यक्ष व मुख्य राज्य समन्वयक-मराठा क्रांती मोर्चा चे करण गायकर यांनी निवेदन द्वारे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत पार पडलेल्या झूम मिटींग मध्ये छत्रपती संभाजी महाराज,संभाजी दहातोंडे यांनी केली आहे.

बातम्या

Don`t copy text!