नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन ; कठोर निर्णय घेण्याची शक्यता
नाशिक मिरर : गेल्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 2500 रूग्ण वाढले असताना ही नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नाराजी व्यक्त करताना जिल्हावासीयांना रविवारपर्यंतची डेडलाईन दिली आहे. यावेळेत परिस्थिती न सुधारल्यास संपूर्ण लाँकडाउनचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाने डोकेवर काढले आहे. बाधीत रुग्णसंख्या 5000 च्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाने अंशतः लाँकडाउन लागू केले आहे. त्यात अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व दुकानासाठी सायंकाळी सातची वेळ ठरवून दिली आहे. मात्र तरीही नाशिककरांकडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. परिणामी जिल्हाधिकारी मांढरे यांनी निर्बंध अधिक कडक करताना प्रसंगी संपूर्ण लाँकडाउनचा इशारा दिला आहे. त्यामुळे लाँकडाउनचा निर्णय आता सर्वस्वी सर्वसामान्य नागरिकांच्या हाती आहे.
