छावाचे करण भाऊ गायकर व आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते शुभारंभ
नाशिक मिरर वेबटीम : त्र्यंबक येथे सुरू असलेला वजन काटा घोटी येथे सुरू करण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेने आंदोलनाच्या माध्यमातून, तसेच पाठपुरावा केल्यामुळे घोटी येथे गुरूवार दि.१४ जानेवारी रोजी घोटी येथील वजनकाटा सुरू झाला. सदर वजनकाटा त्र्यंबक येथे सुरू होता. तो मरकरसंक्रांतीच्या शुभ मुहुर्तावर वजनकाटा सुरु करण्यात आला आहे. छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, यापूर्वीही आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेले आहे, व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांवर अन्याय होतो त्या त्या वेळेस छावा क्रांतीवीर सेना आक्रमकपणे उभी राहते. यावेळीही वजनकाटा घोटीत सुरू होण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भुमिका घेतली, व मागणी मान्य करून घेतली. आज घोटी येथे वजनकाटा सुरू झाला याचे पुर्णपणे श्रेय छावा क्रांतीवीर सेनेसह सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना जाते . तसेच घोटी मधील काही व्यापारी स्वतःची मनमानी करून भात खरेदी करतात. शेतकऱ्याला हमीभाव देत नाहीत. वजन काटे मध्ये मोठी अफरातफर करतात. अशा सर्व व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये छावा क्रंतिविर सेना शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या सर्व व्यापाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन करणार आहे. कुठल्याही व्यापाऱ्याने हमीभावापेक्षा कमी दराने भात खरेदी करू नये. अन्यथा त्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. याची सर्व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी, शेतकऱ्यावर अन्याय सहन केल्या जाणार नाही असे करण यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते संदिप गुळवे यांनीही भाषण करताना सांगितले की, आम्हीही सदर काटा यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी सहकार्य करू. आमदार हिरामण खोसकर यांनी देखील बोलताना सांगितले की, घोटी वजनकाटा आज सुरू झाला पण तो येथून पुढे सुरू राहण्यासाठी ज्या ज्या समस्या येतील त्या सोडवण्यासाठी मी पुर्णपणे जबाबदारीने प्रयत्न करेन. नाशिक जिल्हाधिकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून आणखी जास्त काटे याठिकाणी उभे करून शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. यासाठी प्रयत्न करू तसेच कुठलाही शेतकरी भात घेऊन आल्यानंतर ते तात्काळ खरेदी करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल भोर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. व प्रस्तावित महामंडळाच्या अधिकारी सपकाळे मँडम यांनी मांडले. यावेळी जि. प. सदस्य गोरख बोडके, आमदार शिवराम झोले, जि. प. सदस्य जनार्दन माळी, खरेदी विक्री संघ चेअरमन व तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने या तालुक्यातील ज्येष्ठ नेते व घोटी पोलीस स्टेशनचे पी आय जालिंदर पळे यांसह
छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे , युवा प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग,जिल्हाध्यक्ष आशिष हिरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनिल भोर, शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे, युवा शहराध्यक्ष वैभव दळवी आदिवासी नेते तुकाराम वारघडे, देवा ग्रुप जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, बीजेपी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रवी गव्हाणे, मनसे तालुका उपाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, दादा ग्रुपचे जिल्हाध्यक्ष शंकर दादा गाढवे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पढेर, देवा ग्रुप जिल्हा उपाध्यक्ष केरू दादा चौधरी, छावा क्रांतीवीर सेनेचे नेते प्रताप जाधव, शेतकरी आघाडीचे जिल्हा संपर्कप्रमुख जनार्दन गतीर, तालुकाध्यक्ष नारायण जाधव,गणेश सहाणे, शिवाजी गायकर, सखाराम गव्हाणे, विद्यार्थी युवक कॉग्रेस तालुकाध्यक्ष वैभव धांडे, रामदास धांडे, सुदाम भोर, अरूण भोर, गोटीराम चव्हाण, राजु भाऊ भोसले, युवक कॉग्रेस तालुकाध्यक्ष पंकज माळी, आदिवासी नेते संतोष भाऊ रौंदळ, करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष खंडु परदेशी, तानाजी रूमणे, पांडुरंग शिंदे यांसह तालुक्यातील अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
