नाशिक : जिल्हाधिकारी डॉ. सूरज मांढरे यांना निवेदन देतेवेळी प्रा.कारभारी म्हस्के,प्रा. यशवंत बोरसे, प्रा.विजय डोशी, प्रा. ज्ञानेश्वर म्हस्के, निलेश सुराणा,कुणाल कटारिया आदी
नाशिक मिरर वेबटीम : नाशिक जिल्ह्यातील व शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लास सुरू करण्यासाठी नाशिक व्हे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करुन ‘कोचिंग क्लासेस टीचर फेडरेशन’ नाशिक च्या वतीने निवेदन देण्यात आले. फेडरेशन चे कार्याध्यक्ष प्रा.कारभारी म्हस्के यांनी यावेळी चर्चा करतेवेळी सांगितले की,खाजगी क्लास चालकांनी १८ मार्च २०२० पासून सरकारने कोविड १९ प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व क्षेत्र व व्यवसाय साठी लॉक डाऊन जाहीर केला होता. तेव्हा पासून आजपर्यंत ९ महिने झाले तरी, खाजगी शिकवणी वर्ग बंद आहेत. खाजगी क्लासेस चालकांना मोठ्या आर्थिक अडचणी ना समोरे जावे लागत आहे.विद्यार्थी देखील शिकवणी पासून वंचीत आहेत. आता परिस्थिती बर्यापैकी नियंत्रणाखाली असून सर्वच व्यावसायिकांचे व्यवसाय सुरू झाले आहेत. सातारा, वर्धा, पुणे व नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी त्या त्या जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस ला परवानगी दिल्याने तेथील खाजगी क्लासेस सुरू झाले आहेत.शहरातील कोविड १९ परिस्थिती नियंत्रणात आहे.त्यामुळे पहिली ते आठवी सोडून बाकी वर्गासाठी शासकीय सर्व अटीच्या अधीन राहून सर्व नियमांचे पालन करून कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी यावेळी केली.यावेळी राज्य कार्याध्यक्ष प्रा.कारभारी म्हस्के, यशवंत बोरसे, जिल्हाध्यक्ष विजय डोशी, राज्य संघटक ज्ञानेश्वर म्हस्के,सचिव निलेश सुराणा,कुणाल कटारिया आदी उपस्थित होते. फेडरेशनच्या मागणी नुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सहानुभूती व्यक्त करीत लवकरच कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानागी देऊ असे आश्वासन दिले.
