नाशिक मिरर : घरातील बाथरूम मध्ये असलेल्या प्लस्टिक च्या बादलीत पडून सहा महिन्यांच्या बालकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि ११) बंदावणे मळा सातपूर त्र्यंबकेश्वर रोड येथे भाड्याच्या घरात राहणारे भिकासिंग व कुटुंबातील सदस्य हे सकाळी झोपले असता त्याचा लहान मुलगा श्रीरिश भिकाजय सिंग (वय ६ महिने) हा बालक सकाळी उठल्यावर घरातील खोलीतच असलेल्या बाथरूम मध्ये गेला असता प्लास्टिकच्या बादलीतिल पाण्यात पडला, घरातील लोकांना हा प्रकार समजला असता नाका तोंडात पाणी गेल्याने अस्वस्थ अवस्थेत त्वरित रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाला आहे. त्याचा पच्यात आई वडील,तीन वर्षांचा भाऊ असा परिवार आहे.लहान बालकाचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणी पोलीस हवालदार मारूती भड तपास करत आहे.

बातम्या

Don`t copy text!