नाशिक मिरर वेबटीम : अंबड येथील जेमिनी इन्ट्राटेक कंपनी मधील व्यवस्थापन हे कामगारांचे अनेक अपघात होवूनही औद्योगिक सुरक्षा बाबत दुर्लक्ष करत आहे. तसेच वर्ष भरात सुमारे १८ कामगारांच्या बेकायदेशीर पणे कामावरून काढून टाकले जात असल्याने या बाबत संबंधित कंपनीवर कारवाई करावी. या मागनी साठी आज.दि ८ फेब्रुवारी पासून कामगारांनी अंदोलन सुरू केल आहे.दरम्यान अंबड औद्योगिक वसाहती मधिल अखिल भारतीय मजदूर सभा जेमिनी इन्ट्राटेक कंपनी ६५ कायम कामगार तर इतर ठेकेदार चे पन्नास कामगार काम करतात सदर कंपनीत भाजप नेते गिरीश महाजन यांचे जवळचे समर्थक असलेल्या रिमी राजपूत यांची युनियन होती पण कामगारांनी सदर युनियनचा राजीनामा देवून अखिल भारतीय मजदूर सभा यांचे नेतृत्व स्विकारले आहे. याच काळात व्यवस्थापनाने १८ कायम कामगारांनावर कामावर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील काही कामगारांच्या कामगार उपआयुक्त कार्यालयात चौकशी ही सुरू आहे. आज मात्र व्यवस्थापनाच्या या कारवाई विरोधात कामगारांनी औद्योगिक सुरक्षा व कामगार उपआयुक कार्यालया समोर ठिय्या आदोलन सुरू केलं आहे.

बातम्या

Don`t copy text!