सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकारीच्या उपस्थित भूमिपूजन संपन्न
नाशिक मिरर वेबटीम : परिसरात साजरा होणाऱ्या सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली असून सावरकरनगर येथील पटांगणावर कार्यक्रमाच्या भव्य रंगमंच उभारणीच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी ( दि.१०) समितीचे अध्यक्ष जी.एस.सावळे व कार्याध्यक्ष कांता निलेश शेवरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावर्षी साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. १८ तारखेला शिवशाहीर जाधव यांचा शिवजन्मावर आधारित शाहिरी पोवाडा, रात्री १२ वाजता सातपूर विभागातील महिला व शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचा पाळणा सोहळा व १९ तारखेला भव्य दिव्य असा श्री शिवशंभू महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सवा प्रसंगी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नो मास्क नो एन्ट्री प्रमाणे मास्कचा वापर अनिवार्य केला आहे.
कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे व याची जाणीव लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जोपासत शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व शिवभक्तांनी या दिवशी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे व सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी केले आहे. शिवजन्मोत्सव सोहळा हा पूर्णपणे शासकीय नियमांनुसार पार होणार असून त्याचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावे व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक ,पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते.
