नाशिक मिरर वृत्तसेवा | मंगेश एरंडे 

अशोकनगर परिसरातील विश्वासनगर येथील निलकंठेश्वर महादेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून रोख रकमेची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना (दि.१३ )मध्यरात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास घडली असून, चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूने प्रवेश करत हातोडीच्या साह्याने दानपेटीचे कुलूप तोडले. त्यानंतर त्यातील रोकड रक्कम लंपास करून चोरटे पसार झाले.अंदाजे चोरट्यांनी १० ते १५ हजार रक्कम लांबवली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

या प्रकाराची माहिती सकाळी स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. सातपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

बातम्या

Don`t copy text!