सातपूर ला शिवसैनिका सह दोघं वर चॉपरने प्राणघातक वार

नाशिक मिरर  : अशोक नगर येथील जाधव संकुल येथील अहिल्याबाई होळकर चौक येथे दि.६ शनिवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान तिघांवर चॉपरने प्राणघातक वार केले.संशयित आरोपी संतोष ढमाळ यांस पोलिसांनी अटक केली आहे.जखमी वर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून खाजगी रुग्णालयात उपचार साठी हलवण्यात आले असून जखमी तिघांची प्रकृती आता स्थिर आहे.

शिवसेना महाराष्ट्र कामगार शक्ती सेनेचे राज्य उपाध्यक्ष शाम फर्नांडिस व जाधव संकुल येथील रहिवासी सागर जाधव ,राजू गवळी ,यांच्यावर ऐन दिपावलीत भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान चॉपरने सपासप वार करण्यात आले. अहिल्याबाई होळकर चौक येथे संशयित आरोपी मद्य प्राशन करून भाऊ सोबत भांडण करत होतो.सदर ठिकाणी रस्ता वर गर्दी जमलेली असल्याने शाम यांनी आपल्या चारचाकी जात असताना काय प्रकार सुरू आहे हे पाहण्यासाठी गाडी बाहेर येत विचारपूस केली असता काही समजण्याच्या आत संशयित आरोपी संतोष याने शाम सह इतर दोघा वर चॉपर सपासप वार केले.जखमी अवस्थेत सातपूर पोलीस स्टेशन मध्ये घडलेला प्रकार सांगून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. अधिक तपास पोलिस हवालदार संजय शिंदे व अनंता महाले पुढील तपास करीत आहेत.

 

अशोकनगर ,जाधव संकुल परिसरात गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, महिला सुरक्षा विषयी शिबिर राबविणे, जनजागृती करणे, सामाजिक उपक्रम राबविणे, परिसरात पोलीस मित्र या नात्याने शांतता राखणे.भांडणे वाद मिटवणे इ. सामाजिक कार्यक्रम करीत असतो.त्यामुळे काही समाजकंटक, टवाळखोर व गुन्हेगारी पार्श्वभूमी चे व्यक्ती चा रोष आहे. त्यातुनच सदर प्रकार घडला आहे. – शाम फर्नांडिस, जखमी शिवसैनिक

बातम्या

Don`t copy text!