रस्त्यावरून पहाटे मॉर्निकवाँँक  साठी गर्दी

निफाड :नाशिक मिरर वेेब टिम नाशिक जिल्ह्याची द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालुक्यात गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे. गुरुवार दि ६ नोव्हेंबर रोजी निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात पारा १२ अंशावर स्थिरावल्याची नोंद करण्यात आली आहे. गत सप्ताहात तालुक सप्ताहाच्या प्रारंभापासुन थंडीची चाहुल लागली होती, गुरुवारी पारा १४ अंशावर स्थिरावला होता. तर आज शुक्रवारी पारा दोन अंशानी घसरत १२ अंशावर आला असल्याची माहिती कृषी संशोधन केंद्राचे योगेश पाटील यांनी दिली. या थंडीच्या चाहुलीने रब्बीच्या पिकांसाठी तसेच कांदा पिकासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. द्राक्ष बागायतदारांना द्राक्षमालाची वाढ करण्यासाठी अन्नद्रव्याचे नियोजन करावे लागत आहे. थंडीची चाहुल लागल्याने फळबहार छाटण्यांचा उरक वाढला आहे .कारण पुढील काळात थंडीत वाढ झाल्यास छाटण्या केलेल्या द्राक्षबागांतुन फुटवा निघण्यास अडथळा येण्याचा धोका आहे. त्यामुळे फळबहार छाटण्या करण्याकडे द्राक्षबागायतदारांचा कल वाढला आहे एकुणच आल्हाददायक हवामान तयार झाले आहे. पहाटेच्या गुलाबी थंडीत पायी फिरण्याचा व्यायाम करणारे अबालवृध्दही दिसत आहेत.

बातम्या

Don`t copy text!