मुंबई : राज्यात आज ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,तर आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०७ % एवढे झाले आहे.
आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
राज्यात आज ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण –
राज्यात आज रोजी एकूण १,०६,५१९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
करोना बाधित रुग्ण –
आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,०३,४४४ झाली आहे.
(टीप– आज मृत्यू रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेमुळे काही जिल्हे आणि मनपाच्या प्रगतीपर मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. ही वाढ कोल्हापूर –२६, कोल्हापूर मनपा –१०, सोलापूर – २९, सांगली –५१ आणि नांदेड –२३ अशी आहे. त्यामुळे राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत १३९ ने वाढ झाली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )
