नाशिक मिरर वृत्तसेवा :
इंदिरानगर|तुषार जगताप
भारतीय जनता पार्टी प्रणित कै.धर्मराज बडोदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,श्री प्रतिष्ठान तर्फे ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नानासाहेब हिरामण महाले सुभेदार मिडीयम रेजिमेंट,सद्या नेमणूक फरिदकोट पंजाब व नायक सुहास बाबुराव कोकने सद्या नेमणूक दुर्घमुल्ला,जम्मू कश्मीर येथे कार्यरत असलेले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच भारतीय सेनेतील माजी सैनिक निशांत पाटील,माजी सैनिक प्रकाश मेधने, माजी सैनिक विजय विधाते, माजी सैनिक बलदेव शर्मा, माजी पोलीस अधिकारी परशराम घुगे,उमेशचंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते राहुल सावळे,अतुल नेरपगार, अविनाश बल्लाळ, गोविंद केंगें, शिवाजी काकड,सुहास कोल्हे, नारायणराव यादव, किरण कुलकर्णी,उदय जोशी, विनायक विसपुते, चंद्रकांत पोतदार, विजयराव महाले, रोहित गायधनी, विठ्ठलराव कुलकर्णी,अमीत बुडुख, सुरज जोशी,विनायक दाभोळकर, सतिश शेलार,दिलीप पिंगळे, विजय आंबेकर, गणेश राऊत, शशी अकोलकर, सदाशिव उगले, धनराज चव्हाण, अशोक धर्माधिकारी, प्रमोद देशपांडे, सदानंद पांडूर्लिकर, भिकाजी कुलकर्णी,सुभाष शेवाळे यांच्या हस्ते ध्वजपूजन व भारत मातेचे पूजन करण्यात आले.यावेळी संविधान उद्देशीकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
शिरीष भालेराव यांना संस्कार भारती चे सरचिटणीसपद मिळाल्याने व पंढरी भोसले यांनी ४५ किलोमिटर मॅरेथॉन पूर्ण केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.सौ शुभांगी नांदूर्डिकर व कु.नक्षत्रा महाजन यांनी देशभक्तीपर गीत व भाषण सादर केले.आजी व माजी सैनिक यांनी युद्धभूमीवरील त्यांचे अनुभव मनोगतातून व्यक्त केले.यावेळी श्री प्रतिष्ठानचे भरत शिरसाठ, योगेश रेवगडे, स्वप्नील अमृतकर, ॲड.मनिष पाटील, राम बडोदे, सतिश यादव, किरण पाटील, प्रशांत पाटील, गणेश रत्नपारखी,गोपाळ आव्हाड,ॲड राम नागरे, संतोष हलकरे, नितीन बांडे, प्रकाश सोनवणे, नंदलाल सोनवणे, प्रणव झळके, तेजस वाघ, जेविन मालवीय, मिलींद गायकवाड, नंदलाल फडते, रविंद्र बिरारी,शिवराज हरिविठ्ठल,दीपक जोशी ,राजेंद्र म्हाम्हूनकर,सचिन हिवाळे, परेश पाटील,योगेश लगरे, सुजित मोरे,ॲड.शुभम सोनवणे, उदय बडोदे,विशाल बडोदे, ॲड.अजय बडोदे,अमोल बडोदे, शुभम पारवे,गोकुळ फड, सौ.अर्चना शिरसाठ,सौ शुभांगी टक्के,सौ.मनीषा पाटील,सौ.गौरी रेवगडे, सौ शीतल बडोदे,सौ अदिती यादव सौ.सुवर्णा दाभोलकर, राजश्री यादव, माला पारवे,ॲड अंकिता पारवे, संजना पारवे हजर होते.तसेच जीवन प्रवास जेष्ठ नागरिक संघ,जोगर्स क्लब राजीवनगर, कलानगर गणपती मंदिर, रिद्धी सिद्धी मंदिर एकता कॉलनी, श्रद्धा विहार मित्र मंडळ, पांडवनगरी मित्र मंडळ व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रतिष्ठान चे जयवंतराव टक्के यांनी केले व आभार अशिषजी दाभोळकर यांनी मानले,कार्यक्रमाचे आयोजन अँड.श्याम बडोदे मा.नगरसेवक तथा सरचिटणीस भाजपा नाशिक शहर यांनी केले होते.माजी नगरसेवक श्री.श्याम बडोदे,दिपालीताई कुलकर्णी, सुप्रिया खोडे,सचिन कुलकर्णी, अनिकेत सोनवणे,शैलेश कुलकर्णी आदिंसह श्रद्धाविहार स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष श्री.विलास टिळे,अमित बुडुख,सुहास कोल्हे, योगेश शिंदे व प्रशिक्षक श्री.विशाल शिरसाठ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

