नाशिक मिरर : इंदिरानगर
इंदिरानगरच्या बजरंग सोसायटीतीळ प्रसिद्ध हमुमान मंदिर परिसरात गणेशोत्सवानिमित्त श्री बजरंग मित्र मंडळातर्फे बसविण्यात आलेल्या गणरायाच्या मूर्तीची नगरसेवक अजिंक्य साने यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करण्यात आली.
यावेळी राहुल पहिलवान व पद्माकर ब्रम्हणकर याच्या हस्ते यावेळी साने यांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. बजरंग सोसायटी मैदान व मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सोसायटीतर्फे त्यांचे आभारही मानन्यात आले.
यावेळी बजरंग मित्र मंडळाचे सुनील देसाई, मनोज तुंगार, वाल्मीक पाखले,दत्ता देसाई, ,उमेश तुंगार, सुनील चांडोले,अरुण वाघचौरे,पद्मिनी वारे, निर्मला वारे,सुनील नारखेडे,अजित सारंग, नारायण टापसे,पाटील काका,तिडकेकाका,कुणाल वड़ाळकर,पूर्वा तुंगार, नारखेडेताई, पाटिलताई, वाघचौरेताई,सुवर्णा चांडोले यांच्यासह सोसायटीतील युवा टीम आर्यन,सोहम,जयेश, राकेश, दर्शन,वेदांत,आयुष, श्रीराज, चैतन्य, वेदिका, साई, सिद्धी, देवश्री,श्री, शर्वरीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
