नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था रहावी, यासाठी म्हसरूळ पोलीस ठाण्यातर्फे म्हसरूळ व मखमलाबाद परिसरात सशस्त्र पथसंचलन करण्यात आले. नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरतकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले. सणासुदीच्या काळात पोलिसांकडून विशेष काळजी
घेतली जात आहे. कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये हा त्यामागचा हेतू आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, शिवाजी अहिरे, उपनिरीक्षक विठ्ठल माळी, मयूर पवार यांच्यासह दहा अधिकारी व १०० कर्मचाऱ्यांसह एसआरपी, आरसीपी, क्युआरटी प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, होमगार्डच्या पथकांनी पथसंचलन केले.
