नाशिक मिरर वेबटीम : अंबड लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजार मध्ये आज पुन्हा आगीची घटना समोर आली असून सदर आग सातपूर – सिडको च्या दोन बंबानी विझवली आहे.दरम्यान नवीन वर्षाच्या महिनाभरात आज तिसरी आगीची घटना समोर आली आहे. आज संध्याकाळी जयस्वाल यांच्या प्लाट नंबर १४ वर ठेवलेल्या प्लास्टीक,कापडाच्या चिद्या व इतर भंगारातील साहीत्याला आग लागली. सुरवातीला छोट्या स्वरूपात आसलेली आगीचे रूपांतर मोठ्या प्रमाणावर झाल्याने एकच खळबळ उडाली नागरीकांनी त्वरित अग्नीशमन दलाला फोन केला असतां सातपूर व सिडको चे बंब घटनास्थळी दाखल होत आग विझवली. या मोहीम मध्ये अग्नीशमन दलाचे आधिकारी पी.बी.परदेशी.व्ही.के.मुसळे.एम.एस.बागुल.ए.पी.मोरे.टी.एस.सुर्यवंशी.डी.के.पवार आदीसह कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!