नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी

म्हसरूळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांची बदली नाशिक शहर गुन्हे शाखेत, सहाय्यक पोलीस निरीक्षक आहिरे यांची बदली भद्रकाली पोलीस ठाण्यात,तर सहायक पोलीस निरीक्षक मयुर पवार यांची बदली गडचिरोली येथे झाली आहे. त्यामुळे
त्यांना निरोप देण्यासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व कोविड 19 च्या काळात मदत केलेले पोलीस मित्र, विशेष पोलीस अधिकारी, मित्रपरिवार जमले होते. याप्रसंगी त्यांचा सत्कार केला व फुलांचा वर्षावात त्यांना जड अंतःकरणाने निरोप दिला.

पुढील आयुष्याची भरभराट, तसेच लवकरात लवकर म्हसरूळ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पुन्हा एकदा आमच्यासोबत यावे, ही इच्छा प्रकट करण्यात आली. अनेक चांगल्या आठवणी आम्हाला कायमस्वरुपी स्मरणात राहील व  या सर्व अधिकाऱ्यांनी नागरिक आणि पोलीस यामधील दरी दूर करून म्हसरूळ पोलिस चौकीचे रुप पलटून टाकले होते, असे अधिकारी पुन्हा पुन्हा आमच्या येथे यावे ही इच्छा, यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

 

याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सुनिल सोलशे, रोकडे व सर्व पोलीस कर्मचारी, तसेच अमर निकम, शिवाजी पांडे, मोहन पाटील, प्रवीण तगडे, तुकाराम बोरस्ते, रवींद्र आढाव, अशोक वराडे, गणेश पेलमहाले, सुनील परदेशी आदी उपस्थिती होते.या कार्यक्रमाचे आयोजन विशाल मोराडे यांनी केले होते.

बातम्या

Don`t copy text!