पालकमंत्री छगन भुजबळ यांना आम्ही सारे सामान्य शेतकरी व नाशिककर व छावा क्रांतिवीर सेनेचे वतीने निवेदन

नाशिक मिरर :

सप्टेंबर २०२० मध्ये नाशिकचे पोलीस अधिक्षक म्हणून सचिन पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर पाऊले उचलली.त्यातून काही मंडळींचे हितसंबंध टोकाचे दुःखावले गेल्याने त्यांच्या बदलीचे षडयंत्र यशस्वीपणे राबवून ते अंमलातही आणले गेले.अवघ्या दहा अकरा महिन्यात सचिन पाटील यांच्यासारखा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी या जिल्ह्यातून कार्यकाल पुर्ण होण्याआधीच बदलून जात असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात राहणारा समान्य माणूस तसेच शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे.

आम्ही सारे सामान्य शेतकरी व सामान्य नाशिककर समिती व छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व पदाधिकारी यांच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना सचिन पाटील यांची बदली रद्द करावी याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे.

अकाली बदली केल्या मुळे संघटनेच्या वतीने पदाधिकारी यांनी असंतोष प्रगट करून आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.सचिन पाटील यांच्या बदलीमागे शेतकऱ्यांना फसविणारी चांडाळ चौकडी रोलेटचा जुगार चालविणारे,विविध प्रकारचे अवैध धंदे चालक,गुटखा आणि रेती तसेच भुमाफीया आणि या सर्व अवैध प्रवृत्तींना अभय देणारे राजकारण कारणीभूत असल्याचा जिल्हावासियांचा समज झाला आहे. अवघ्या दहा महिन्यांच्या अल्प कार्यकाळात सचिन पाटील यांनी शेती मालाचे पैसे बुडवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या बांधल्या,तरूणाईला फशी पाडून अनेक संसार उध्वस्त करणाऱ्या ,जुगारात हरल्याने तरूणांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या रोलेट बादशहाला वेसण घातली,महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा व्यापार रोखण्याचा प्रयत्न केला,राजकिय वरहस्त आहे म्हणून परिणामांची चिंता न करता आमदाराच्या आप्तस्वकीयाचा बेकायदेशीर बायो डिझेल पंप उध्वस्त केला,इतकेच नाही तर तरूण पिढीला बरबादीच्या वाटेला घेऊन जाणारे अवैध हुक्का पार्लर ,रेव्ह पार्टींवर कठोर कारवाई करून मुंबईची नाशिक जिल्ह्यात येऊ घातलेली गुन्हेगारी संस्कृती वेशीवर थांबवली. अशा नाना प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न सचिन पाटील यांनी प्रामाणिकपणे केला सर्वात महत्वाची बाब म्हणजे जिल्ह्यातच ञव्हे तर देशात संवेदनशील म्हणून ओळखला जाणाऱ्या मालेगाव शहर परिसरात सामाजिक सलोखा वृध्दींगत होण्यासाठी पो.अधिक्षक म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणून सर्वतोपरी प्रयत् केले.आठवड्यातील दोन दिवस मालेगाव मध्ये डेरा टाकून परिस्थितीवर नजर ठेवणारे पहिले अधिक्षक म्हणून सचिन पाटील यांचे नाव पोलीस खात्याच्या इतिहासात कोरले गेले आहे.

त्याचे दृश्य परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत.अशा या कर्तव्य तत्पर अधिकाऱ्याला कार्यकाल पुर्ण करण्याची संधी न देता बदली करणे अन्यायकारक तर आहेच पण आपल्या सरकारकडून जनतेशी झलेली प्रतारणा देखील आहे.अशा अधिकाऱ्यांना सन्मानीत करण्याऐवजी चांगल्या कामासाठी दंडीत करण्याची ही प्रथा आपण मोडीत काढाल अशी जिल्हावासियांना आपल्याकडून अपेक्षा आहे म्हणून ही बदली तात्काळ रद्द होण्यासाठी नाशिक जिल्हा आपल्यासमोर पदर पसरून विनंती करीत आहे,ही विनंती आपण अग्रक्रमाने मान्य करून सचिन पाटील यांची बदली तात्काळ रद्द करून नाशिक जिल्ह्याला न्याय द्यावा.अन्यथा इच्छा नसतानाही जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेला रस्त्यावर येऊन तिव्र आंदोलन छेडावे लागेल.असे करण गायकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

बातम्या

Don`t copy text!